Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 मे 2021 | शनिवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. कोरोनातून बऱ्या झालेल्या आठ रुग्णांनी डोळे गमावले, सूरतमध्ये म्युकोरमायकोसिसचा कहर तर गुजरातमध्ये दोन हजारांपेक्षाही जास्त रुग्णांना बाधा
2. ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या जागतिक ख्यातीच्या मराठमोळ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू, कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन
3. सोलापुरात रात्रीपासून पुढील आठवडाभर कडक लॉकडाऊन, तर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी
4. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांमध्ये मोठी वाढ, वाढता धोका लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार
5. चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी, आतापर्यंत 42 देशांत लसीकरणासाठी वापर
6. मुंबईत खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट, मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी दहा हजार रुपयांची आकारणी, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
7. रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी चंद्रपुरात डॉक्टर आणि दोन नर्ससह पाच जणांना अटक, वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ
8. आता कोविड केअर सेंटरमध्येही पैसे मोजावे लागणार, पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा प्रयोग, प्रतिदिन 700 रुपयांचा दर
9. ऐन मे महिन्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, बुलढाण्यात काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान, तर लातुरात वीज कोसळून गुरांचा मृत्यू
10. अभिनेता सलमान खानकडून पुन्हा मदतीचा हात, रोजंदारीवर काम करणाऱ्या बॉलिवूडमधल्या 25 हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करणार