स्मार्ट बुलेटिन | 02 नोव्हेंबर 2021 | मंगळवार | एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक; 100 कोटींच्या वसुलीचे आरोप
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
2. देगलूर-बिलोली विधानसभेसाठी आज मतमोजणी, भाजप-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
3. नीट परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रची कार्थिका नायर देशात पहिली
मुंबई : आज मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रच्या कार्थिका नायर सह तेलंगाणाचा म्रीनल कुट्टेरी आणि दिल्लीच्या तन्मय गुप्ता या तिघांनी देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. 12 सप्टेंबर रोजी NTA (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे देशभरात मेडिकल प्रवेशासाठीची नीट 2021 परीक्षा घेण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास हिरवा कंदील दिल्या नंतर सोमवारी रात्री 8 वाजता हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला
4. NCB च्या पथकाकडून समीर वानखेडेंची चार तास चौकशी, जबाब नोंदवला
5. किरण गोसावी फ्रॉड, त्यानेच समीर वानखेडेंच्या नावाने डील केली; सॅम डिसूझाचा गंभीर आरोप
मुंबई : किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसूझा याने केला. सॅम डिसूझाने एबीपी माझाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.
6. माझ्या अंगावर कुणी आलं तर त्याला सोडणार नाही, अमृता फडणवीस यांचा इशारा
7. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट, राज्यात 809 नव्या रुग्णांची भर
8. जागतिक तापमानवाढ जगासाठी धोकादायक, विकसनशील देश अधिक प्रभावित, नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
9. जोस बटलरची शतकी खेळी, इंग्लंडचा चौथा विजय, सेमीफायनचं तिकीट फिक्स
10.अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार