Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 02 मार्च 2022 : बुधवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करण्याचा अमेरिकेचा निर्णय, युक्रेनच्या जनतेच्या साहसाचं कौतुक करत पुतीन यांच्यावर बायडेन यांचा निशाणा
Russia Ukraine War President Joe Biden Speech Highlights : रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या 'स्टेट ऑफ द युनियन'ला संबोधित करताना त्यांनी रशियावर जोरदार टीका केली. युक्रेनवर हल्ला करून पुतीन यांनी घोडचूक केली आहे. रशियाची आणखी आर्थिक कोंडी करणार असून अमेरिकेची हवाई हद्द रशियासाठी बंद करण्यात आल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे. युक्रेनवर अमेरिकेचे सैन्य उतरवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. आपल्या भाषणात जो बायडन यांनी युक्रेनचे कौतुक केले. रशियाने युक्रेनकडून एवढ्या मोठ्या प्रतिकाराची अपेक्षाच केली नसणार असेही बायडन यांनी म्हटले.
2. युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी वायूसेनेच्या ग्लोबमास्टरचं उड्डाण, सध्या किव्हमध्ये एकही भारतीय नसल्याची माहिती, युद्धात प्राण गमावलेल्या नवीनच्या कुटुंबियांचं मोदींकडून सांत्वन
3. किव्हवर मोठ्या हल्ल्याची रशियाची तयारी, भारतीय दूतावासाच्या दीड किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट, उपग्रहानं टिपली रशियाची अजस्त्र फौज
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. अशातच रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका खाजगी यूएस कंपनीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, 40 मैल (सुमारे 64 किमी) लांबीचा रशियन लष्करी ताफा युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेनं जात आहे. सॅटेलाईट फोटोच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, खाजगी यूएस कंपनीनं सांगितलंय की, सोमवारी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेला रशियन लष्करी ताफा दिसला, जो यापूर्वी दिसलेल्या 17 मैल (27 किमी) पेक्षा जास्त लांब आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीजनं (Maxar Technologies) असंही म्हटलं आहे की, अतिरिक्त भूदल तैनाती आणि जमिनीवर हल्ला करणारे हेलिकॉप्टर युनिट्स युक्रेनियन सीमेच्या उत्तरेस 20 मैल (32 किमी) पेक्षा कमी दक्षिण बेलारूसमध्ये दिसले. या चित्रांवरून असं दिसून येतं की, रशिया आपले हल्ले अधिक तीव्र करण्याच्या योजना अंमलात आणण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दरम्यान, दुसरीकडे, अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, रशियन सैन्याच्या वतीनं सध्या कीवच्या दिशेनं कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
4. रशिया आणि युक्रेनमधल्या दुसऱ्या बैठकीकडे जगाचं लक्ष, युरोपियन संसदेसमोर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकींचं आवेशपूर्ण भाषण, तर महिला पत्रकाराला अश्रू अनावर
5. तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह की आरक्षणाशिवाय? आज सर्वोच्च न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 02 मार्च 2022 : बुधवार
6. ईडी कारवाईविरोधात नवाब मलिकांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, तर 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात सीबीआय अनिल देशमुखांचा जबाब नोंदवणार
7. उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी बैठकांचा सिलसिला, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, तर संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबतं
8. माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर कट्टर कार्यकर्त्याकडून फसवणुकीचे आरोप; आरोप खोटे असल्याचं नाईक निंबाळकरांचं स्पष्टीकरण
9. आजपासून मुंबई आणि पुण्यातल्या शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, तर 70 टक्के महाराष्ट्र निर्बंधमुक्त
10. मुंबई, ठाण्यासह उपनगरांत 15 टक्के पाणीकपात, भातसा धरणाच्या विद्युत केंद्रांमध्ये बिघाड, दुरुस्तीपर्यंत पाणी जपून वापरण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन