एक्स्प्लोर
मिशन अॅडमिशन : मुंबईतील टॉप 10 कॉलेजची माहिती

मुंबई: सध्या वातावरणातला उकाडा वाढतोय आणि टेन्शनही. दहावी असो, बारावी असो वा पदवी, निकालांचा हंगाम असल्यानं प्रत्येकाला उत्सुकता आहे ती मार्कशीटची. या मार्कशीटवरचे गुणच या विद्यार्थ्यांचा उत्तम भविष्यकाळ घडवणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या वाटचालीत एबीपी माझाही हातभार लावणार आहे. 'मिशन अॅडमिशन' या आमच्या विशेष वृत्तातून मुंबईतल्या टॉप टेन कॉलेजची माहिती दिली जाणार आहे. तर पाहूयात टॉप टेन मधील पहिलं कॉलेज. 1 ) रुईया कॉलेज, माटुंगा 'कॉलेज ऑफ एक्सलन्स' हे वाक्य रुईया कॉलेजच्या बोर्डवर झळकतं. रुईया कॉलेजची कट ऑफ लिस्ट - अकरावीसाठी *आर्टसचे प्रवेश 90 टक्क्यांना बंद *सान्यसचे 92 ते 93 टक्के *व्होकेशनल 94 टक्के रुईया कॉलेजची कट ऑफ लिस्ट - बारावीसाठी *आर्टसचे प्रवेश 75-80 टक्क्यांवर बंद *सायन्सचे आणखी जास्त 80 ते 85 टक्क्यांवर बंद होतात. पारंपरिक शिक्षणपद्धती सोडून जर तुम्हांला काही वेगळ्या वाटा चोखाळायच्या असतील तर रुईयामध्ये तुम्हांला अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. रुईयाच्या कॅम्पसमध्ये एकूण 27 डिपार्टमेंटमध्ये 63 पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हांला तुमची वाट नक्कीच मिळून जाईल. रुईयामधील इतर अभ्यासक्रम *ट्रॅव्हल अँन्ड टुरिझम मँनेजमेंट *ग्रीन हाऊस मँनेजमेंट *फार्मा अॅनॅलिटीकल सायन्स *याशिवाय सायन्समधील बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमस्ट्री या विषयांसाठी रुईया कॉलेज प्रसिद्ध आहे. मेरिट लिस्ट, मार्कशीट आणि टक्केवारीचा जीवघेणा खेळ, शैक्षणिक आयुष्यात कुणालाच चुकलेला नाही. मात्र हा खेळ रुईया कॉलेजला आल्यानंतर थोडा सोपा होतो. कारण अंगभूत कला हा रुईया कॉलेजचा श्वास आहे आणि नाट्य चळवळ हा तर प्राणवायू. डीडी कौशल सेंटर हे स्थापन करण्यासाठी परवानगी मिळवणारं रुईया हे मुंबईतील पहिलं कॉलेज असल्याचं प्राचार्य सांगतात. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत पास होण्यासाठी शिकवत नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. कला, क्रीडा, समाजकारणातील अनेक थोरामोठ्यांना याच कॉलेजनं घडवलंय. रुईया कॉलेजचे माजी विद्यार्थी अजित वाडेकर, क्रिकेटपटू लालचंद रजपुत, क्रिकेटपटू नंदु नाटेकर, बँडमिंटनपटू शम्मी कपूर,अभिनेता मधु दंडवते, माजी रेल्वे मंत्री कस्तुरी रंगन ,इस्त्रोचे माजी चेअरमन हे सगळेजण रुईयाची शान आहेत.
रुईया कॉलेज मुंबईतील नामवंत कॉलेज असलं, तरी इतर कॉलेजप्रमाणे या कॉलेजचाही तोच प्रश्न आहे. या कॉलेजलाही स्वत:चं खेळाचं मैदान नाही. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत पूर्वीसारखं वातावरण जपलं जात नसल्याचा आरोप सध्याचे विद्यार्थी करत आहेत. दहावीनंतर बारावी....बारावीनंतर डिग्री पण डिग्रीनंतर काय या प्रश्नाचं उत्तर रुईयामध्ये नक्कीच मिळतं. ७९ वर्षांचं रुईया कॉलेज कॉलेज ऑफ एक्सलन्स हा युजिसी सन्मान मिळवणारं भारतातलं पहिलं कॉलेज आहे. कॉलेज जीवन हा आयुष्यातील सर्वात जास्त लक्षात राहणारा टप्पा, आणि अर्थातच भविष्याचं प्रवेशद्वारसुद्धा. या प्रवेशद्वारातला प्रवेश सुकर व्हावा, यासाठी आपण अटोकाट मेहनत करतोच, याच प्रयत्नांना एबीपी माझाचीही साथ आहे. मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
रुईया कॉलेज मुंबईतील नामवंत कॉलेज असलं, तरी इतर कॉलेजप्रमाणे या कॉलेजचाही तोच प्रश्न आहे. या कॉलेजलाही स्वत:चं खेळाचं मैदान नाही. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत पूर्वीसारखं वातावरण जपलं जात नसल्याचा आरोप सध्याचे विद्यार्थी करत आहेत. दहावीनंतर बारावी....बारावीनंतर डिग्री पण डिग्रीनंतर काय या प्रश्नाचं उत्तर रुईयामध्ये नक्कीच मिळतं. ७९ वर्षांचं रुईया कॉलेज कॉलेज ऑफ एक्सलन्स हा युजिसी सन्मान मिळवणारं भारतातलं पहिलं कॉलेज आहे. कॉलेज जीवन हा आयुष्यातील सर्वात जास्त लक्षात राहणारा टप्पा, आणि अर्थातच भविष्याचं प्रवेशद्वारसुद्धा. या प्रवेशद्वारातला प्रवेश सुकर व्हावा, यासाठी आपण अटोकाट मेहनत करतोच, याच प्रयत्नांना एबीपी माझाचीही साथ आहे. मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई आणखी वाचा























