'एबीपी माझा'ची 'बाप्पा माझा' स्पर्धा... स्पर्धेत कसा सहभाग घ्याल?
तीनही स्पर्धांसाठी 8291147757 या एकाच व्हॉट्सअँप क्रमांकावर फोटो/व्हीडीओ (आरतीसाठी) पाठवायचे आहेत. स्पर्धेचा कालावधी 2 ते 11 सप्टेंबर आहे. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी एक सोन्याचं नाणं 'एबीपी माझा'तर्फे देण्यात येईल.
नमस्कार मंडळी!
'एबीपी माझा' परिवाराकडून तुम्हाला, तुमच्या परिवार आणि मित्रमंडळींना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा. काय मग? घरात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर आता लगबग वाढली असेल ना? कुणाचा दीड दिवस, कुणाचे गौरी गणपती तर कुणाचे बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत मुक्काम करणार असतील. आता साक्षात बाप्पांचं घरी आगमन होणार म्हटल्यावर सजावट देखणी आणि लाखात एक झालीच पाहिजे, नाही का? त्यात गौराई घरी येणार असतील तर त्याचं कौड-कौतुक जरा जास्तच करणार ना आपण? अहो, मग इतक्या प्रेमानं, कष्टानं घडवलेल्या सजावटीचं कौतुक फक्त पाहुण्यांकडूनच कशाला, अख्ख्या महाराष्ट्रातूनच होऊ द्या की! कसं काय विचारता? तुमचा लाडका, तुमच्याच परिवारातला सदस्य 'एबीपी माझा' आहे की! तुमच्या घरातल्या गणेशोत्सवाला सेलिब्रेट करण्यासाठी 'एबीपी माझा' घेऊन आलाय तीन आकर्षक स्पर्धा...
घरगुती गणपती आरास स्पर्धा
तुमच्या घरातल्या गणपतीसाठीची सजावट, आरास यांचा फोटो आम्हाला पाठवा. पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुटुंबाला प्रत्येकी एक सोन्याचं नाणं 'एबीपी माझा'तर्फे देण्यात येईल.
गौरी-महालक्ष्मी आरास स्पर्धा
तुमच्या घरातल्या गौरी-महालक्ष्मींची सजावट, आरास यांचा फोटो आम्हाला पाठवा. पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुटुंबाला प्रत्येकी एक सोन्याचं नाणं 'एबीपी माझा'तर्फे देण्यात येईल.
बाप्पाची आरती
प्रत्येक घरात आरतीचा एक वेगळाच बाज, सूर आणि ताल असतो. अशी कुठलीही एक आरती आम्हाला पाठवा. निवडक तीन कुटुंबांना मिळेल प्रत्येकी एक सोन्याचे नाणे!
स्पर्धेद्वारे येणारे आणि निवडलेले फोटो आणि व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या सोशल मीडिया आणि टी.व्ही.वर दाखवले जातील. निवडलेल्या स्पर्धकांमधून अंतिम विजेते गणेशोत्सवानंतर जाहीर केले जातील.
तेव्हा म्हणा, "गणपती बाप्पा मोरया......एबीपी माझाच्या स्पर्धेत भाग घेऊया!!!!!"
नियम व अटी
- वरील तीनही स्पर्धांसाठी 8291147757 या एकाच व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोटो/व्हिडीओ (आरतीसाठी) पाठवायचे आहेत.
- स्पर्धेचा कालावधी 2 ते 11 सप्टेंबर आहे. एका कुटुंबाने वरील तीन पैकी कोणत्याही स्पर्धेसाठी एकदाच कंटेंट (फोटो/व्हिडीओ) पाठवायचा आहे. वर दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सदर कंटेंट पाठवायचा आहे. सोबत आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल पाठवणं अनिवार्य आहे.
- स्पर्धकांनी फक्त आपल्याच घरातील गणपती/गौरींचे फोटो, आरती पाठवायची आहे. नातेवाईंकांकडील, शेजाऱ्यांकडील फोटो-आरती पाठवू नयेत. आपण पाठवलेल्या फोटो-आरतीबद्दल वाद उपस्थित झाल्यास निवड रद्द होऊ शकते.
- व्हॉट्सअॅपवर फोटो-व्हिडीओ पाठवताना त्यांची क्वॉलिटी कमी होऊ शकते, त्यामुळे चांगल्या मोबाईलमधून फोटो-व्हिडीओ काढावेत. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रातील घरगुती गणेशोत्सवासाठी आहे.
- स्पर्धेचं स्वरुप, नियम आणि निवड यात बदल करण्याचे सर्वाधिकार 'एबीपी माझा'कडे असतील. स्पर्धेसाठी फोटो-व्हिडीओ पाठवणं हेच आपल्याला नियम व अटी मान्य असल्याचं निदर्शक असेल.