एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा! नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमाकेदार पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना  धमाकेदार पत्र लिहिले आहे.  हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे.

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना  धमाकेदार पत्र लिहिले आहे, हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. या पत्रातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या गैरकारभाराकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्याच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत, खात्यात घोळ, पदाचा दुरुपयोग तसेच येणाऱ्या काळात एकूणच महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर त्याचा होणारा वाईट परिणाम ह्याबाबत त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की नाना पटोले यांचे बोट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आहे. 

नाना पटोले यांनी या संदर्भात ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, "ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याच्या बातमीत तथ्य नाही. माझे पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही."

नाना पटोले यांनी पत्रात महाजेनको, म्हणजेच, राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना महाजेनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती देण्याची विनंती त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर लोकहितास्तव या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी अशी ही मागणी केली आहे. कोळसा पुरवठा आणि वॉशिंगचे काम हे रुखमाई infrastructure प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे.         

पटोले पत्रात रुखमाई इन्फ्रावर गंभीर आरोप 

  •  कंपनीचे कुठलेही नेटवर्थ नाही
  •  कंपनीचा टर्नओव्हर नाही 
  • कंपनीला सेक्युरिटी क्लियरन्स नाही 
  • कंपनीला कोळसा वॉशिंगचा कुठलाही अनुभव नाही 
  • कंपनीने ज्या कंपनीसह जेव्ही केले आहे. ती कंपनी काळ्या यादीत आहे 
  • अटी, शर्ती पूर्ण केल्या नसताना गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
  • महाजेनकोला हे वेळेवर कोळसा पुरवठा करू शकणार नाही.
  • याचा परिणाम महाजेनकोच्या वीज उत्पादनावर होणार आहे.          

नक्की कोणावर करत आहेत नाना आरोप? 

 पत्रात रुखमाई इन्फ्रा ही कंपनी संजय हरदवाणीची असल्याचे नानांनी नमूद केले आहे.  नाना पटोले यांच्या पत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई ह्यांच्या व्यतिरिक्त शासनाच्या काही संबंधित सचिव, खनिज महामंडळाचे चेयरमन इत्यादींना लिहिले आहे. पण त्यांनी ज्या खात्यासाठी ही सर्व निविदा प्रक्रिया घेण्यात आली आहे. त्या ऊर्जा खात्याच्या मंत्र्यांना, म्हणजेच त्यांच्याच पक्षाचे मंत्री  नितीन राऊत यांना मात्र ह्या पत्राची कॉपी नाही.  नितीन राऊत ह्यांच्या खात्यासाठीच हा निविदा काढण्यात आला असून तो संजय हरदवाणीला देण्यात आला आहे संजय  हरदवाणी ही ऊर्जा मंत्री नितीन राऊत ह्यांच्या अत्यंत नजीकची व्यक्ती असल्याची माहिती सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाजेनको आणि संजय हरदवाणी ह्यांना निशाण्यावर घेताना नाना पटोले यांना नक्की कोणावर निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट आहे 

ABP Majha Exclusive | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा! नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमाकेदार पत्र

नुकतीच डॉक्टर नितीन राऊत यांची आपण ईडीकडे तक्रार केल्याचे ट्विट एका अॅडव्होकेट तरुण परमार यांनी केले आहे. त्यातच आता ही तक्रार. एकंदरीत डॉक्टर नितीन राऊत ह्यांची चिंता वाढवणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. 
 
सध्या नाना पटोले आणि डॉक्टर नितीन राऊत ह्यांच्यात विस्तव ही जात नाही असे कळते. नाना पटोले - नितीन राऊत समीकरण बिघडण्यासाठी बरीच कारणे आहेत. याला पहिले कारण ठरले ते म्हणजे - प्रदेश अध्यक्षपद ज्यासाठी नाना आणि राऊत दोघे ही रेसमध्ये होते. दोघांनीही दिल्ली वाऱ्या केल्या.  या  दरम्यान काँग्रेसच्या आंतरिक लढ्यात जी मंडळी अनेक दशके कट्टर राऊत विरोधक होती त्यांनी नानाचा साथ दिला. त्यामुळे नाना राऊत विरोधकांच्या जवळ गेले.  प्रदेश अध्यक्ष झाल्यावर नितीन राऊत ह्यांना विधान सभा अध्यक्ष बनवून त्यांचे ऊर्जा खाते नाना पटोले यांना मिळावे यासाठी ही प्रयत्न झाल्यामुळे राऊत नाराज झाले. कॅबिनेटमधून निघून विधान सभा अध्यक्ष बनण्याची राऊत यांची बिलकुल इच्छा नसल्याचे कळते. हा राजकारणाचा भाग झाला. पण एकंदरीत आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे आता ते नक्की ह्या पत्रावर पुढे काय करतात हे बघावे लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget