BLOG Majha : एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर; 'धांडोळा' ब्लॉगला प्रथम पुरस्कार
ABP Majha Blog Majha: एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आले.
ABP Majha Blog Majha Competition: 'एबीपी माझा'तर्फे (ABP Majha) दरवर्षी 'ब्लॉग माझा' (Blog Majha) स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड केली जाते. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. आज म्हणजेच, 28 मार्चला 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' (Majha Maharashtra Digital Maharashtra) या कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.
ब्लॉग माझा स्पर्धेत प्रथम पुरस्कार यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल यांना, द्वितीय अनिल गोविलकर, तर तृतीय क्रमांक तुषार म्हात्रे यांना मिळाला आहे. आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो ब्लॉगर्समधून टॉप ब्लॉग निवडणं, हे परीक्षकांसमोरील मोठं आव्हान होतं. फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित करण्यात येते.
विजेत्यांच्या ब्लॉग बद्दल :
प्रथम पुरस्कार
यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल : 'धांडोळा' नावाचा ब्लॉग... https://dhaandola.co.in ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. या ब्लॉगमध्ये विविध विषयांवरच्या विशेषत: जुन्या पुस्तकांबद्दल लेख आहेत. अतिशय उत्तम भाषेत आणि वाचनीय शैलीतले माहितीपूर्ण लेख देण्यात आले आहेत.
द्वितीय पुरस्कार
अनिल मुकुंद गोविलकर : www.govilkaranil.blogspot.com ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. हिंदी मराठी चित्रपटांतली गाणी, अभिजात संगीत, गायक आणि संगीतकारांवर लिहिलेले रसास्वादपर लेख दिले आहेत.. उत्तम भाषा, वर्ण्यविषयाची उत्तम जाण, आणि वाचनीय शैलीतील विवेचन करण्यात आलं आहे.
तृतीय पुरस्कार
तुषार चंद्रकांत म्हात्रे : https://tusharmhatre1.wixsite.com/theriyankinare ही त्यांच्या ब्लॉगची लिंक आहे. 'दरियाँ किनारे' या ब्लॉगमध्ये अथांग समुद्राच्या पोटात दडलेल्या वनस्पती, जीव यासंदर्भात लेख दिले आहेत.