आधी काकी म्हणाली, आदित्य असं करणार नाही, आज राज-उद्धव भेट, आदित्य ठाकरे म्हणतात...
आदित्य ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, " ते फक्त लग्नात शुभेच्छा देण्यासाठी गेले होते".
Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची बाजू घेतली होती. आदित्य असं काही करेल असं वाटत नसल्याचे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. याबाबत आज आदित्य ठाकरेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला वाटतं आम्ही त्यावर बोललो आहोत. आता परत त्यावर बोलण्यापेक्षा, मुंबईतील प्रश्न महत्वाचे आहेत". याशिवाय आदित्य ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, " ते फक्त लग्नात शुभेच्छा देण्यासाठी गेले होते".
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र
अशातच आज एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकेर एकत्र आले होते.
नेमकं काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?
दिशा सालियन प्रकरणासंदर्भात SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे आपण कसं पाहता, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शर्मिला ठाकरेंना विचारला होता. हा प्रश्न ऐकताच शर्मिता ठाकरेंनी, "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती. पुढे बोलताना शर्मिला ठाकरेंनी, "चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत," असं म्हटलं होते.
स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंबंधी आम्ही पुरावे देऊ
मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंबंधी आम्ही पुरावे देऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले. रोड घोटाळ्याबद्दल आम्ही एक्सपोज करतोय. बीएमसीला मान्य करावं लागेल की 400 कोटीचे वरियेशन थांबावे लागले, हा सुद्धा विषय लोकायुक्त समोर आणणार आहोत असे ठाकरे म्हणाले. ज्या रोडचे कंत्राट रद्द केले ते कंत्राटदार कोर्टात गेले आहेत. नवीन रस्त्याचा निविदा काढली त्यात 300 कोटी कमी केले आहेत. आधीचे कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडर वर स्टे आणला आहे. 11 जानेवारी पर्यत टेंडर वर स्थिगिती असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दिल्लीच्या आदेशानं मुंबईची लूटमार सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
किती रस्ते झाले ते दाखवा?
आयुक्तांसोबत आम्ही यायला तयार आहोत. किती रस्ते झाले ते दाखवा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. रस्ते पूर्ण होणार नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करताय. एमटीएचएलचे 83 टक्के काम आमच्या सरकारमध्ये पूर्ण झालं आहे. आता उद्घाटनला एवढा वेळ लागत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हे काम अजून तयार नाही ?दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवलं आहे. नवी मुंबई मेट्रोचा काम सुद्धा तसेच 5 महिने ठेवले आहे. दिघी स्टेशन 8 महिने झालं तयार आहे. पण व्हीआयपीची उद्घाटनाला वेळ मिळत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उदघाटन करता येत नाही, तुम्ही राज्याचा काय करणार ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
संसदेत घुसखोरी करणारे कोणाच्या पास वर आले ?
दोन खतरो के खिलाडी संसदेत घुसले होते. ते कोणाच्या पास वर आले ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. यावर खासदरांना प्रश्न सुद्धा विचारू दिले जात नाहीत. उद्या हे तरुण काहीही घेऊन आले असते तर, मी त्यांचं समर्थन करणार नाही. नोकऱ्या नाहीत म्हणून हे पाऊल उचलल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही अयोध्येला जाऊ. त्यासाठी कोणाच्या निमंत्रणची गरज नाही
मंदिर निर्माणशी या लोकांचा संबंध नाही. ते आता आयोद्धेला मंदिर उद्घाटनाला जात आहेत. आम्ही हा विषय घेतला होता. माझे आजोबा या सगळ्या मंदिर निर्माणासाठी जे आंदोलन झाले त्यामध्ये आधीपासून होते. आम्ही अयोध्येला जाऊ. त्यासाठी यांच्या किंवा कोणाच्या निमंत्रणची गरज नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: