एक्स्प्लोर

शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरमधील महिला साडेतीन वर्षांनी सापडली!

शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याचं प्रकरण ज्या महिलेमुळे ऐरणीवर आलं ती साडेतीन वर्षांनंतर सापडली आहे. या महिलेच्या पतीने दाखल केलेल्या याचिकेनंतर औरंगाबाद खंडपीठाने मानवी तस्करीच्या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.

शिर्डी/इंदूर : शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याचं प्रकरण ज्या महिलेमुळे ऐरणीवर आलं ती साडेतीन वर्षांनंतर सापडली आहे. इंदूर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. तसंच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतर आता दिप्ती सोनी सापडल्या आहेत.

इंदूर येथील दीप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

38 वर्षीय दीप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदूरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दीप्ती सोनी गुरुवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इंदूरमधील बहिणीच्या घरी परतल्या, अशी माहिती मनोज सोनी यांचे वकील सुशांत दीक्षित यांनी दिली. दीप्ती सोनी सापडल्याची माहिती कोर्टाला देण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (18 डिसेंबर) सोनी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली.

कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, "दीप्ती सोनी कुटुंबासह 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथून त्या बेपत्ता झाल्या. अखेर तीन वर्ष चार महिन्यांनी त्या गुरुवारी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी इंदूरमधील बहिणीच्या घरी सुखरुप परतल्या. मनोज सोनी यांच्या सासऱ्यांनी त्यांना फोन करुन दीप्ती बहिणीच्या घरी परत आल्याचं कळवलं. दिप्ती तीन वर्षांपासून इंदूरमध्येच राहत होत्या आणि मनोज यांच्या सासऱ्यांना त्या सापडल्या."

"मी बडोद्यात ड्युटीवर होतो तेव्हा मला सासऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दीप्ती गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तिच्या बहिणीच्या घरी परतल्या आहेत. मी तिथून लगेच इंदूरला आलो आणि रात्री सव्वाबारा वाजता तिला भेटलो. ती मागील साडेतीन वर्षे नेमकी कोणत्या ठिकाणी होती, याबाबत तिने स्पष्ट सांगितलं नाही. ती म्हणाली की, शिर्डीच्या साई मंदिराबाहेरच्या दुकानात गेली असता ती तिथे चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिला पुढचं काहीच आठवत नाही. ती परत आली हाच आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. मागील साडेतीन वर्षे आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होती," असं मनोज सोनी यांनी सांगितलं.

तर दीप्ती सोनी यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, "त्या एका वृद्ध महिलेसह इंदूरमध्येच राहत होत्या." "पण शिर्डीतून इंदूरमध्ये कशा परत आल्या हे त्यांना सांगता आलं नाही," असं मनोज सोनी यांनी सांगितलं.

हायकोर्टाचे पोलिसांच्या तपासावर ताशेरे दुसरकीडे दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का तपास राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असे निर्देशही न्यायालयाने दिले. एबीपी माझा ने 2019 मध्ये डिसेंम्बर महिन्यात याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं.

औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण तपासाचा 200 पानी अहवाल निरर्थक ठरवला आहे. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही, असं न्यायालयाने म्हटलं. मात्र मानवी तस्करीबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरु केला आहे, असं उत्तर यावर पोलिसांनी दिलं.

पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी

वर्ष         बेपत्ता      तपास बाकी 2017      71              20 2018     82              13 2019     88              14 2020   38               20

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget