Stock Market : सलग तिसऱ्या सत्रात शेअर मार्केटमध्ये वाढ, Sensex 740 तर Nifty 173 अंकांनी वधारला
Share Market : आयटी, बँक, कॅपिटल गुड्स आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
मुंबई : सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 740 अंकांनी तर निफ्टी 173 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.28 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,683 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची वाढ होऊन तो 17498 वर पोहोचला आहे.
आज 2001 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1213 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 93 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना आयटी, बँक, कॅपिटल गुड्स आणि रिअॅलिटी या या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. तर मेटल इंडेक्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.8 ते 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात Bajaj Finserv, HDFC Life, Tata Consumer Products, Bajaj Finance आणि Hero MotoCorp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून ONGC, Hindalco, JSW Steel, ITC आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Bajaj Finserv- 3.80
- HDFC Life- 3.69
- TATA Cons. Prod- 3.05
- Bajaj Finance- 3.02
- Hero Motocorp- 2.76
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- ONGC- 5.26
- Hindalco- 4.99
- JSW Steel- 4.82
- ITC- 2.12
- Tata Steel- 1.99
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha