एक्स्प्लोर

रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा

ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) पोसलं आणि ओबीसी आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केला अशा महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याचे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्क केलं.

Laxman Hake : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election)  पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अशातच मराठा (Marataha) आणि ओबीसी (Obc)आरक्षणाच्या मुद्यावरुन देखील वातावरण तापलं आहे. ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) पोसलं, त्यांच्या आंदोलनाला रसद दिली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केला अशा महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याचे मत लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी व्यक्त केले. यामध्ये रोहित पवारांसह राजेश टोपेंच्या नावाचा समावेश असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.

 सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावं

ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे.  सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे की हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर  बाबतीतून ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील असे हाके म्हणाले. मी ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मते या तरुणाचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत त्याच्यावर कारवाई करावी असे हाके म्हणाले.

विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक

आम्ही आज रोजी 50 उमेदवार पडण्याची यादी तयार केली आहे. 50 उमेदवार निवडून आणण्याची यादी लवकरच तयार करु असेही हाके म्हणाले. ओबीसी मतांची भीती कधी वाटणार आहे. विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. नेतृत्व पुढे यायला लागले तर दुय्यम वागणूक मिळते. ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये  50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला. 

 रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार पाडणार

50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार असल्याचे हाके म्हणाले.  रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार आहोत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार आहेत. लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल. मुख्यमंत्री हे एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत. लक्ष्मण हाके दारू पिला म्हणून ओबीसी आरक्षण घालवू पाहतात. अनेक पक्षांना सांगणे आहे की जे ओबीसीचा मुद्दा लावून धरणार त्यांना ओबीसी सत्तेत बसवणार असल्याचे हाके म्हणाले. संभाजी भोसले यांच्या रजिस्टर्ड पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत. एखाद्या धर्माचे प्रारणस्थल पडून पक्ष निर्माण होत नसतो असेही हाके म्हणाले.

आरक्षण रेशनचे दुकान नाही

शिंदे समिती बेकायदा समिती आहे. मराठा समाज गरीब असू शकतो, मात्र ओबीसी आरक्षणामुळे मराठा गरीब कसा असू शकतो? असा सवाल हाकेंनी केला. फडणवीस म्हणतात एक लाख रोजगार मराठा तरुणांना दिले आहे. मग एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत. तर फडणवीसांना टार्गेट करण्यात येते. फडणवीसांनी यांचे ऑडिट करावे. शरद पवारांना मतं मागण्यासाठी दुसरे काही कारण उरले नाही असेही हाके म्हणाले. स्थानिक संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेले आहे, कोर्टात प्रकरण आहे. आरक्षण म्हणजे पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही, प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही. आरक्षण रेशनचे दुकान नाही, आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी असेही हाके म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget