एक्स्प्लोर
Advertisement
खंडणीसाठी 5 वर्षीय बालकाचं अपहरण, 6 तासात पोलिसांनी छडा लावला
दरम्यानच्या काळात डॉक्टर सिध यांना इशानच्या सुटकेसाठी 20 लाख रुपयाच्या खंडणीसाठी फोन येण्यास सुरुवात झाली होती. इकडे पोलिसांनी कंपाउंडरला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याच्यावर संशय आल्याने कवडे यांनी त्याला पोलिसी हिसका दाखवला.
पंढरपूर : 20 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या सहा तासात सुटका करुन 3 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. माळशिरस येथील डॉक्टर सिध यांचा पाच वर्षाचा मुलगा इशानचे काल दुपारी चार वाजता अपरहण केले होते.
डॉक्टर सिध यांच्या दवाखान्यातील कंपाउंडर इशानला शिकवणीस सोडण्यास गेला होता. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी त्याच्या हातातून इशानला हिसकावून घेवून पळून गेल्याचे कंपाउंडरने सांगितले. यानंतर सिध कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक सागर कवडे यांनी आपल्या सोबत पंढरपूर शहर पोलिसांची टीम घेवून माळशिरस गाठले.
दरम्यानच्या काळात डॉक्टर सिध यांना इशानच्या सुटकेसाठी 20 लाख रुपयाच्या खंडणीसाठी फोन येण्यास सुरुवात झाली होती. इकडे पोलिसांनी कंपाउंडरला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याच्यावर संशय आल्याने कवडे यांनी त्याला पोलिसी हिसका दाखवला. यानंतर कंपाउंडरने अपहरणाबाबत माहिती दिली. मग पोलिसांनी वेगाने इशानच्या शोधास सुरुवात केली. अपहरणकर्ते दुचाकीवरुन इशानला घेवून गेल्याच्या धाग्यावरुन नातेपुते, मेढक मार्गे म्हसवडच्ये घाटातून पोलिसांची टीम तारखेड येथे पोचली.
या ठिकाणी शाळेच्या जवळ यातील दोन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर तिथेच जवळ असलेला इशान पोलिसांना मिळाला. यावेळी पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली असून अजून तिघांचा शोध सुरु आहे. काल दुपारी चार वाजता अपहरण झालेला इशान रात्री दहा वाजता पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप त्याच्या आईच्या कुशीत सोपवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
बीड
बीड
Advertisement