(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 49 नवे कोरोनाबाधित, तर 32 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईतील आज नव्याने सापडलेल्या 49 रुग्णांपैकी केवळ दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत आहे. आज मुंबईत 49 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. काल 41 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 299 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
राज्यात शुक्रवारी 130 रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 812 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 130 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 8, 2022
8th April, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 49
Discharged Pts. (24 hrs) - 32
Total Recovered Pts. - 10,38,467
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 299
Doubling Rate -18087 Days
Growth Rate (1st April- 7 April)- 0.004%#NaToCorona
राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज सात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 326 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 96, 38, 701 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या