एक्स्प्लोर

अग्निवीरमधून 340 महिला नौदलात सहभागी होणार, सर्व शाखांमध्ये काम करणार 

Agniveer :  नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी झाले आहेत. त्यापैकी 340 महिला नौदलात सहभागी होत आहेत.

मुंबई : अग्निवीरमधून (Agniveer) 340 महिला (women) नौदलात ( Navy ) सहभागी होणार आहेत. या 340 महिला नौदलाच्या सर्व शाखांमध्ये काम करणार आहेत, अशी माहिती  भारतीय नौदलाचे पश्चिम कमांडचे  व्हाइस अडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी दिलीय. 

 नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी झाले आहेत. त्यापैकी सुमारे 340 महिला नौदलात सहभागी होत आहेत. पुढच्या वर्षी आम्ही महिला अधिकाऱ्यांना सर्व शाखांमध्ये सहभागी करून घेणार आहोत. नौदलाच्या सर्व 29 शाखांमध्ये या महिला काम करतील. मेडिकल आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही तुकडी तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण किती जण यामध्ये सहभागी होतात त्याचे नंबर येतील, असे सिंह यांनी सांगितले.  

अजेंद्र बहादुर सिंह यांनी कोस्टल सेक्युरिटीबाबतचीही माहिती दिली. "कोस्टल सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्यांवर आमही चर्चा करतोय. यामध्ये अनेक एजन्सी आहेत. चीफ सिक्रेटरी आणि आमच्यात एक बैठक देखील झाली आहे. को ओरडीनेशनची गरज असून त्यासाठी सहकार्य करत आहे. राज्य आणि आमची दोघांची जबाबदारी आहे. काही नव्या गाईडलाइन्स बनविल्या गेल्या असून कोस्टल सेक्युरिटीवर काम सुरू आहे, अशी माहिती सिंह यांनी दिलीय.  

देशभरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या तस्तरीत वाढ झालीय. याबाबत पोलताना सिंह म्हणाले, "नार्कोटिक्स ऑपरेशनसाठी सर्व एजन्सी एकत्रित रित्या काम करतात. ड्रग पकडण्यात आपल्याला यश मिळत आहे, ते देशात आपण येऊ देत नाही. अलीकडील काळात ड्रग्स तस्करीविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत."

सिंह म्हणाले, "भारताची 45 जहाजे शिपयार्डमध्ये तयार होत आहेत. यामध्ये खासगी आणि पब्लिक सेक्टर शिपयार्ड आहेत. मार्मा गोवा युद्धनौका 18 डिसेंबरला कमिशनिंग होणार आहे. प्रोजेक्ट 17 अल्फा 6 जहाज यामध्ये आहेत.  हे जहाज माजगाव आणि कोलकत्तामध्ये बनत आहेत. शिवाय गोव्यात तलवार क्लासचे दोन जहाज तयार होत आहेत. तर दोन जहाजे देशाबाहेर बनत आहेत. तर उर्वरित 43 जहाजांचे बांधकाम भारतात बनत आहेत. तर दोन जहाजांचे काम रशियामध्ये सुरू आहे.  

"विक्रांत युद्धनौकेबद्दल तुम्हला अभिमान वाटेल. ही 76 टक्के स्वदेशी जहाज असून आधुनिक आणि भारतातील मोठी युद्धनौका म्हणूज त्याकडे पाहिलं जाताय. आम्ही त्याचे ट्रायल सुरू केले असून नौसिक याबद्दल खूप प्रोत्साहित आहेत. विक्रांतचे 6 ते 8 महिने कारवार आणि गोवा येथे ट्रायल सुरू राहतील. मान्सून आधी हे ट्रायल आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, अशी माहिती सिंह यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या 

Women Agniveer In AirForce : भारतीय वायुसेना करणार महिला अग्निवीरांची भरती, प्रथमच सैनिक म्हणून होणार रुजू 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget