29th June Headlines: राज्यभरात आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा उत्साह; आज दिवसभरात...
29th June Headlines: आज राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. दिवसभरात राजकीय इतर क्षेत्रातही घडामोडी घडणार आहेत.
29th June Headlines: आज राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी, भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली आहे. तर, दुसरीकडे विविध जिल्ह्यातील विठुरायाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा सण समजला जाणारा बकरी ईदही साजरी होणार आहे. दोन्ही सण उत्साहात साजरे होत असताना त्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस दक्ष आहेत. आज दिवसभरात राजकीय इतर क्षेत्रातही घडामोडी घडणार आहेत.
>> आषाढी एकादशी विशेष...
आज आषाढी एकादशी असून राज्यभरातील वातावरण विठुमय झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली आहे.
- पहाटे माऊली आणि तुकोबारायांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान होईल.
- माऊलींची पालखी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नगर प्रदक्षिणा पूर्ण करेल. त्याच दरम्यान तुकोबारायांच्या पादुकाही नगर प्रदक्षिणा करतील.
- नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊलींची आणि विठुरायाची भेट होईल. तुकोबारायही आज विठुरायाची भेट घेतील.
पंढरपूर
- अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तिपत्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार आहे. सकाळी तीन रस्ता येथे मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सुमारास, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.
बुलढाणा
- आज आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी असते.
मुंबई
- प्रति पंढरपूर समजले जाणारे वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आज भाविकांची गर्दी लोटणार.
- बकरी ईद निमित्त मिनारा मज्जिद मध्ये नमाज पठण होईल.
पुणे
- आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल वाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी उसळणार आहे.
बारामती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुरंदर तालुक्यातील सासवड दौऱ्यावर असणार आहेत.
कोल्हापूर
- आषाढी एकादशीच्या निमित्त आज कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी इथून नंदवाळच्या दिशेने पायी दिंडी निघते. प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळची ख्याती कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
नाशिक
- नाशिकच्या इदगाह मैदानावर सकाळी बकरी ईद निमित्त नमाज पठण होणार आहे. हजारो मुस्लिम बांधव उपस्थित राहतील.
मनमाड – ईद उल अजहा म्हणजेच 'बकरी ईद' निमित्त मालेगाव येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण केली जाणार आहे. या मैदानावर मौलाना मुफ्ती मोहम्मद हे हजारोंच्या उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत नमाज अदा करतात.
अहमदनगर
- प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी येथे आज आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- बकरी ईद निमित्त अहमदनगरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे.
जळगाव
- आषाढी एकादशी निमित्त मुक्ताई नगर येथील संत मुक्ताई मंदिरात धार्मिक पूजा अर्चा सोबत खजूर आणि केळीची आरास केली जाणार आहे.
- अमळनेर येथील मनगळग्रह मंदिर संस्थानकडून विष्णू याग पुजेसह, दिंडी काढण्यात येणार असून पाच हजार स्थानिक वारकरी यामध्ये सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर
- छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज पंढरपूर येथे प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तिथेही हजारो भाविक एकत्र येतात.
जालना
– जालन्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी यात्रा महोत्सवानंतर आज एकादशी दिवशी पालखी सोहळा निघत असतो. 300 वर्षाची परंपरा असलेल्या आनंदी स्वामींच्या पालखीची आज शहरातून भव्य मिरवणूक निघते.
इतर
मणिपूर
– कॉग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्या दरम्यान हिंसाग्रस्त भागाला भेटी देणार आहेत. सकाळी खाजगी विमानाने मणिपूर साठी रवाना होतील