एक्स्प्लोर

Teachers Constituency Elections : उमेदवारी अर्ज छाननी परीक्षेत सर्व 27 'शिक्षक' उमेदवार पास; नागपूर विभागात सोमवारी चित्र स्पष्ट होणार

Nagpur : यंदा महाविकास आघाडीतर्फे चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यापैकी कोणत्या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल 27 उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. त्यापैकी सर्वच शिक्षकांनी उमेदवारी अर्ज छाननी परीक्षा पूर्ण केली असून अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत आहे. मात्र यंदा महाविकास आघाडीतर्फे प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यापैकी कोणत्या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. भाजपने उमेदवार बदलला तर पदवीधर मतदारसंघातील निकालांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनेही सावध भूमिका घेतली. उमेदवार जाहीर करण्यासाठी मंगळवारपर्यंत भाजप आणि कॉंग्रेसचे 'पहले आप पहले आप' सुरु होते. नंतर भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

यानंतर महाविकास आघाडीची मुंबई बैठक झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करणार होते.  नागपूर विभागात आपला उमेदवार राहणार नसून आपण शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सतीश इटकेलवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने स्टोरीमध्ये 'ट्विस्ट' आला.

16 जानेवारीपर्यंत गोंधळ कायम

भाजप समर्थित शिक्षक परिषद असो, शिक्षक भारती वा शिक्षक सेना या संघटनांच्या पाठबळावर आणि वैयक्तिक संबंधांच्या भरवशावर ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश ईटकेलवार यांनी व्यक्त केला असला तरी महाविकास आघाडीत चाललंय तरी काय, या प्रश्‍नाचे उत्तर आता 16 जानेवारीला अर्ज परत घेण्याच्या दिवशी माहिती होणार आहे. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिल्यानंतरही राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय का अशी चर्चा आहे.

नागपूर विभागातील उमेदवारांमध्ये...

नागपूर विभागातून रामराव चव्हाण, सुधाकर अडबाले, मत्यूंजय सिंग, राजेंद्र झाडे, अजय भोयर, दीपराज खोब्रागडे, सुषमा भड, रविंद्र डोंगरदेव, बाबाराव उरकुडे, विनोद राऊत, सतीश जगताप, नरेंद्र पिपरे, गंगाधर नाकाडे, नागो गाणार, श्रीधर साळवे, सतीश इटकेलवार, उत्तमप्रकाश शहारे, नीलकंठ उइके, राजेंद्र बागडे, देवेंद्र वानखेडे, नीमा रंगारी, सचिन काळबांडे, प्रवीण गिरडकर, अतूल रुईकर, मुकेश पुडके, संजय रंगारी, नरेश पिल्ले या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

ही बातमी देखील वाचा...

काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget