एक्स्प्लोर
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर 20 मोर्चे, 250 शिष्टमंडळे धडकणार
औरंगाबाद : शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्ष, संघटनांचे सुमारे 20 मोर्चे विभागीय आयुक्तलयावर धडकणार आहेत. तर 250 पेक्षा अधिक शिष्टमंडळं मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत.
बैठकीसाठी शहरात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, 9 आयपीएस अधिकाऱ्यांसह सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आलं आहे.
शहरातील वाहतूकीतही बदल
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने बरेच मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय निवेदने देण्यासाठीही नागरिकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींचा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी पोलिसांनी विभागीय आयुक्त, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद केले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीवर येणाऱ्या मोर्चांना आमखास मैदान येथे अडविण्यात येणार आहे. यामुळे आमखास मैदान ते सुभेदारी विश्रामगृह, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग मंगळवारी बंद राहणार आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने हर्सूल कारागृहाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे येणारी सर्व वाहने उद्धवराव पाटील चौकात रोखली जाणार आहेत. उद्धवराव पाटील चौकापासून पुढे मार्ग बंद राहणार आहे.
शहागंजकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तर पंचायत समिती कार्यालयाकडून येणारी वाहने विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासमोर अडविण्यात येतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा
बंदोबस्तासाठी 9 अधीक्षक आणि उपायुक्त, 96 पोलीस निरीक्षक, 200 सहाय्यक निरीक्षक आणि फौजदार, 2700 पोलिस कर्मचारी, राखीव दलाच्या चार तुकड्या, अतिशिघ्र कृती दलाच्या पाच तुकड्या, बॉम्बशोधक आणि नाशक विभागाची 8 पथके, गोपनीय शाखेचे कर्मचारी, स्थानिक पोलिस, दंगल काबू पथक, स्ट्रायकिंग फोर्स तसेच वज्रचाही बंदोबस्तात समावेश करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement