एक्स्प्लोर

पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले

वर्धा: देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमधील दारुगोळा भांडारात आगीनंतर स्फोटांची मालिका सुरु झाली. या स्फोटामध्ये ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 16 जवान शहीद झाले आहेत. तर 19 हून अधिक जवान जखमी आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवी दिल्लीत लष्काराने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले शहीद मेजर मनोज कुमार काल रात्री दीडच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटानंतर दोन अधिकाऱ्यांसह 20 जवान शहीद झाले. धक्कादायक म्हणजे या स्फोटाच्या भीषण आवाजाने 12- 13 जवानांच्या कानाचे पडदे फाटले आहेत.   दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे सुद्धा पुलगावला भेट देणार आहेत.   दोन गावांचं स्थलांतर या स्फोटामुळे दारुभांडार परिसरातील दोन गाव पूर्णपणे स्थलांतर करण्यात आली आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती की परिसरातील असलेल्या घरांची छतं कोसळली आहेत. काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून घरांसाठी लावलेले खांब कोसळल्यामुळे अनेकांनी घर सोडलेली आहेत.   28 किमीमध्ये दारुगोळा भांडार दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला असून, अजूनही येथून स्फोटांचे आवाज सुरु असल्याची माहिती समजते आहे.   या स्फोटामुळे केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दोन गावं नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पुलगाव दारुगोळा केंद्राचा संपूर्ण भाग हा लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे येथे स्फोट कशामुळे घडला याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.   लष्कराच्या पुलगाव दारुगोळा भांडारात स्फोटांची मालिका   याबाबत अद्याप लष्करी अधिकाऱ्यांकडूनही कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. सुरक्षेचा प्रश्न असल्यानं लष्करी अधिकारी याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले रात्री दीडच्या सुमारास स्फोट : खासदार रामदास तडस रात्री दीडच्या सुमारास आवाज आला, गच्चीवरुन पाहिल्यावर आगीच्या ज्वाला दिसत होत्या. त्याचवेळी पुलगाव आग असल्याचं समजलं. आम्ही गाड्या काढून तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी परिसरातील गावकरी घराबाहेर पडले होते, असं वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितलं.   दरम्यान सध्या आग आटोक्यात आल्याची माहिती मिळत आहे, असंही तडस यांनी सांगितलं.   घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- निवृत्त कर्नल पुलगाव दारुगोळा भांडारात नेमकी आग कशामुळे लागली, याबाबतची माहिती चौकशीनंतर समोर येईल, मात्र पठाणकोटप्रमाणे इथेही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निवृत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.   आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे.   इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही.   इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो.   मात्र आज जी आग लागली ती नेमकी कोणत्या बंकरला लागली आणि त्या बंकरच्या सुरक्षेसाठी किती जवान होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget