एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र
नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत नाराजीनाट्य रंगलं आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची स्थायी समितीवर निवड करण्यास विरोध केला जातो आहे. पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पदं दिल्यानं नाराज झालेल्या 20 नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सोपवले आहेत.
विजय चौगुले यांनी पक्षवाढीसाठी एकही काम केलेलं नाही. विरोध पक्षनेतेपद असूनही पालिकेत कोणतीही छाप पाडली नसल्याचा आरोप शिवसेनेतूनच केला जातो आहे.
एकाच व्यक्तीला अनेक पद देण्यावरून ही नाराजी आहे. इतरांनाही संधी मिळावी, अशी नगरसेवकांची मागणी आहे. विजय चौगुले यांनी पक्ष वाढीसाठी एकही काम केले नाही. विरोधी पक्ष नेते पद असूनही पालिकेत कोणतीच छाप पाडली नसल्याचा आरोप त्यांच्यावर स्वपक्षातील नेत्यांनी केला आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हाप्रमुख पद दिलेले नाही. कार्यकारीणी घोषित करण्यात आलेली नसल्यानेही शिवसेनेत नाराजी आहे. आपले महत्व कायम राहण्यासाठी नवी मुंबईतील शिवसेनेत अस्थिरता कायम ठेवण्यात ठाण्यातील नेत्यांनी धन्यता मानली असल्याचेही आरोप होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement