एक्स्प्लोर
माळशिरसमध्ये दोन चिमुकल्यांची हत्या करुन जमिनीत पुरलं
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीमध्ये 2 चिमुकल्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर या चिमुकल्यांना पुरुन ठेवण्यात आलं.
सोलापूर : पंढरपूरजवळच्या माळशिरस तालुक्यात दोन अल्पवयीन मुलांची हत्या करुन त्यांना पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या चिमुकल्यांपैकी एकटा दोन वर्षांचा तर दुसरा केवळ 4 महिन्यांचा आहे.
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीमध्ये 2 चिमुकल्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर या चिमुकल्यांना पुरुन ठेवण्यात आलं. यातील एकाचं वय 2 वर्षं, तर दुसऱ्याचं वय फक्त 4 महिन्यांचं आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना वर्तवला आहे.
दरम्यान दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पोलीसांच्या तपासाला दिशा मिळणार आहे. सध्या पोलिसांनी या चिमुकल्यांच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement