एक्स्प्लोर
ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण
![ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण 2 Police Attacked On Bar Manager Fro Wine On Dry Day ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/20110703/Belgaon.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : ड्राय डे असताना बारमध्ये जाऊन पोलिसाने दारुची मागणी करून मॅनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली आहे. पोलिसांची हॉटेल मॅनेजरला केलेली मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेज पाहून जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. ड्राय डेच्या दिवशी पोलिसांनी हॉटेलात जाऊन दारूची मागणी केली. त्यावेळी मॅनेजर अजित आणि राजू याना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या मॅनेजरला कागवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस फुकट दारू, जेवण करतात आणि महिन्याला तीस हजार रुपये घेतात असा गंभीर आरोप हॉटेल मॅनेजरने केला आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)