एक्स्प्लोर
नगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवलं. अमरापूर-शेवगाव मार्गावर आज सकाळी ही दुर्दैवी अपघात झाला.
संजय ओमासे आणि हनुमंत सानप अशी मृतांची नावं आहेत.
संजय आणि हनुमंत हे दोघेही दुचाकीवरुन शेवगावहून अमरापूरकडे जात होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने फलकेवाडीजवळ या दोघांना चिरडलं. गंभीर दुखापत झाल्याने दोघांनी तिथेच प्राण सोडले.
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान भरधाव वेगाने वाहनारी वाहनं आणि रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
