एक्स्प्लोर

UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला

UPI Payment MDR Charge: एखाद्या ग्राहकाने व्यापाऱ्याला दिलेल्या पैशांवर हे शुल्क आकारले जाणार होते. हे शुल्क 0.4 टक्के इतके असणार होते. मात्र, आता हा निर्णय बदलण्यात आले आहे.

UPI Payment Charges Rule : UPI व्यवहारांसंदर्भात (UP Transaction ) केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर (UPI Payment) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. व्यापारी वर्गात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आता केंद्र सरकारने UPI व्यवहारांवरील MDR शुल्काबाबचा हा निर्णय फिरवला आहे. त्यामुळे आता निवडक व्यापारी UPI व्यवहारांवरच MDR शुल्क लागू होईल. तसेच यापूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत म्हणजे 15 ऑक्टोबपासून होणार होती. मात्र, नव्या घोषणेनुसार केंद्र सरकारने  यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी ही दिवाळीनंतर लागू होईल, असे सांगितले आहे. दिवाळीच्या तोंडावर हा व्यापारी आणि ग्राहक या दोहोंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. (UPI Payment MDR Charge)

मात्र,दिवाळीनंतर UPI व्यवहारांवर MDR शुल्क हे तात्काळ लागू होईल, असे NPCI च्या UPI अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. शुल्क लागू करण्याची निश्चित तारीख स्वतंत्रपणे जाहीर होईल. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. दिवाळीनंतरही सरसकट सर्व UPI व्यवहारांवर नाही, तर निवडक व्यापारी व्यवहारांवरच शुल्क लागू होणार असल्याचे UPI अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सामान्य ग्राहकांना UPI पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नव्हते. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना UPI द्वारे होणाऱ्या 2000 रुपयांच्या व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क भरावे लागणार होते. यामध्ये सामान्य ग्राहकांचा समावेश नव्हता. मात्र, इतर कोणत्याही कराप्रमाणे व्यापारी वर्गाकडून यूपीआय व्यवहारांचे शुल्कही अंतिमत: ग्राहकांकडूनच वसूल केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे याचा फटका सामान्य वर्गालाही बसण्याची दाट शक्यता होती. मात्र, आता निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवरच शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी आणि सामान्य ग्राहक दोघांनाही दिलासा मिळणार आहे. परंतु, कोणत्या यूपीआय व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

आणखी वाचा

मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित

फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget