एक्स्प्लोर

Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...

Tejas Thackeray On Nitesh Rane: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले होते.

Tejas Thackeray On Nitesh Rane: मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात 11 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या (CJP Protest) समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासोबत तेजस ठाकरेही (Tejas Thackeray) सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले होते. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकीय भूमिकेत दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली. मात्र, तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली आहे. त्यामुळे तेजस ठाकरेंच्या राजकीय सहभागावरुन मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी टीका केली होती.

तेजस ठाकरे नेमकं काय म्हणाले? (Tejas Thackeray On Nitesh Rane)

नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील म्हणून तेजस ठाकरे शिवाजी पार्कमधील आंदोलनाला आले असतील, असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. आता नितेश राणेंच्या टीकेला देखील तेजस ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?, असा प्रश्न पत्रकारांनी तेजस ठाकरेंना विचारला. यावर माणसांचे हक्कच दुर्मिळ झाले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आलोय, असं तेजस ठाकरेंनी उत्तर दिलं. तेजस ठाकरेंनी दिलेल्या या उत्तराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भावांच्या खांद्याला खांदा लावून तेजस ठाकरेंनी पोलिसांची गाडी आडवली- (Shivsena UBT Tejas Thackeray)

तेजस ठाकरे म्हणजे वन्यजीव संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे असा त्यांचा आतापर्यंतचा परिचय. मात्र, रविवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना भवन परिसरात आदित्य आणि अमित ठाकरे भूमिका मांडत असताना, भावांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची गाडी अडवून धरणारे तेजस ठाकरे हे पाहायला मिळाले. याआधीही अनेक वेळा तेजस ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांच्या उपस्थितीने तेजस ठाकरे राजकारणात येणार? अशा चर्चा रंगल्या होत्या अशातच रविवारी पोलिसांच्या गाडीसमोर हात खुले करून उभे राहिल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Eknath Shinde On Thane Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरेंचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर प्रकरण; एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, 15 दिवसांनी म्हणाले...
ठाण्यातील ठाकरेंचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर प्रकरण; एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, 15 दिवसांनी म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Embed widget