एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

19th April Headlines: आज कॅबिनेट बैठक, राज्यात आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; आज दिवसभरात 

19th April Headlines: वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

मुंबई: राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसंबंधात आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये काहीतरी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचसोबत आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक 

आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात  राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अवकाळी पावसाने राज्याचं किती नुकसान झालेलं आहे याचा आढावा घेतला जाईल. त्याचसोबत राज्यातील कोविडची परिस्थिती काय आहे याचाही आढावा घेतला जाणार आहे. आजच्या कॅबिनेट मधून शेतकऱ्यांना मदत मिळणार का? याकडे लक्ष आहे. 

आज राज्यात काही ठिकाणी गारपिठीची शक्यता 
 
देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. मात्र विदर्भात अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार पोहोचलंय. अशात काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय. 
  
वाशिमच्या जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथ मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरुवात 

जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिममधील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरूवात झाली आहे. पहिली लेपन प्रक्रिया कोणत्याही वादविवाद शिवाय पूर्ण होऊन जवळपास 25 दिवस पूर्ण झाली. आता दुसरी लेपन  प्रक्रिया सात दिवस चालणार असून त्या नंतर पुढचे 15 ते 20 दिवसानंतर मूर्तीचे दर्शन भाविकांकरीता खुले होणार असून लेपन प्रक्रिया होईपर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली. 
 
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी

वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिकांच्या वतीनं त्यांचे वकील आज कोर्टात बाजू मांडणार आहेत. 

धाराशिव श्री कालभैरवनाथ  जोगेश्वरीच्या यात्रेचा दुसरा दिवस 

श्री कालभैरवनाथ  जोगेश्वरीच्या नावान चांगभलच्या जयघोषात सोनारीतील मानाचा रथोत्सव जल्लोषात. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक हजर रहातील. राज्यातील लाखो कुंटूबाचे कुलदैवत असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारीचे श्री काळभैरवनाथ- जोगेश्वरीचा मानाचा रथोत्सव जल्लोषात पार पडत आहे. लाखो भाविकांची उपस्थिती असल्याने चांगभलच्या जयघोषात दुमदुमुन आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत माखून गेला होता. यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.
  
समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुनावणी
 
समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुप्रिम कोर्टात सुरू असलेली सुनाणी आज सुद्धा होणार आहे. कालच्या सुनावणी दरम्यान समानता आणि सन्मानाने जगण्यासाठी समलौंगिक वावाहाला मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.
 
शहीद अमोल गोरेच्या पार्थिवावर आज वाशिममध्ये अंतिम संस्कार
 
भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील सोनखास गावातील अमोल गोरे या 33 वर्षीय जवानाला वीरमरण आलंय. अरुणाचल प्रदेशातील वापरी यांग बुल नाला येथे 14 एप्रिल रोजी हिमसख्खलन झाल्याने काही जवान बेपत्ता झाले होते. याच दुर्घटनेत अमोल गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. अमोल गोरे सैन्यदलात नायक या पदावर कार्यरत होते. तर ते दि 26 मार्च 2011 ला सैन्यदलात भरती झाले होते. आज त्यांचे पार्थिव राहते गाव सोनखास येथे आणण्यात येणार असून त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget