एक्स्प्लोर
तरुणाच्या छळाला कंटाळून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या
औरंगाबादमधील एका 18 वर्षीय तरुणीने तरुणाच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील वडनेर गावात तरुणाच्या छळाला कंटाळून एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रामानंद राठोड हा तरुण गेल्या तीन वर्षापासून तरुणीची छेड काढत होता. त्याने लग्नासाठी तिच्याकडे तगादाही लावला होता. एकतर्फी प्रेमातून तो तिची वारंवार छेड काढत होता. काल देखील रामानंदने तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराला वैतागून अखेर तरुणीने आत्महत्या केली. असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने आपल्याशीच लग्न करावे यासाठी रामानंद सातत्याने तिला छळत होता. तिने आपल्याशी लग्न नाही केले तर आपण तिचे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही. तसंच तो तिला जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपी रामानंद राठोड आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement