एक्स्प्लोर

फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर

फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत.

यवतमाळ : फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवावर कोण उठलंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकावर फवारणी करताना किटकनाशकांमुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणी करताना तब्बल 369 शेतकऱ्यांना  गेल्या तीन महिन्यात विषबाधा झाली असून त्यातील 7 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. रोज नवीन 10 ते 12 रुग्ण यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे याच रुग्णालयातील वार्ड क्रमांक 12 मध्ये 40 बेड असून 40 बेडवर फवारणीतून विषबाधा झालेले शेतकरी उपचार घेत मृत्यूशी झुंज देत आहेत. तर 6 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी जहाल किटकनाशके पिकांवर फवारणी करत आहेत. मात्र फवारणी करताना शेतकरी योग्य ती काळजी घेत नसल्याने विषबाधा होत आहे. विदर्भातील जिल्हानिहाय परिस्थिती
  • यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना 369 शेतकऱ्यांना विषबाधा झाली, तर 7 जणांनी जीव गमावला.
  • अकोला जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 100 रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यातील 5 शेतकऱ्यांचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.
  • बुलडाणा जिल्ह्यात 52 शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली.
  • वर्धा जिल्ह्यातही 22 रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं.
  • गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना धानावर किटकनाशक फवारताना 3 शेतकऱ्यांना विषबाधा झाली.
फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. किटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, किटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना किटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार किटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Embed widget