एक्स्प्लोर

16th April Headlines: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मविआची वज्रमुठ सभा, आज दिवसभरात

16th April Headlines : आज मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

16th April Headlines :  आज मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स दिले आहे. आज सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे...

नवी मुंबई – आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आळा आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

नागपूर – महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत. 

प्रयागराज – गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या. करण्यात आली. मेडिकल तपासणीसाठी घेऊन जात असताना बाईकवरून आलेल्या तिघांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलेय, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
 
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट... गारपीटीचा सडा पडल्याचे अनेक ठिकाणी चित्र  आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स दिले आहे. आज सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे... दिल्लीचे सर्व खासदार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाबचे इतर मंत्री केजरीवाल यांच्यासोबत सिबीआय मुख्यालयापर्यंत पोहचून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 

बंगळुर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन दिवसीय कर्नाटक दौरा... आज राहुल गांधी कोलारमधून प्रचाराचा शुभारंभ करतील... याच कोलारमध्ये राहुल यांनी मोदी आडनावाची टिपन्नी केली होती.. त्यावरून राहुल यांची खासदारकी रद्द झाली आहे... दुपारी राहुल गांधी कोलारमध्ये सभा घेणार आहेत.

मुंबई - नाट्य परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल... मुंबईत यशवंत नाट्य मंदिर माटुंगा,  याठिकाणी मतदान होणार आहे... प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच पॅनेल समोरासमोर उभ आहे.

पुणे  -  कै. खा. गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आलयं.... सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलंय... शरद पवार, नितीन गडकरी, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, बाळा नांदगावकर, सचिन आहीर, प्रकाश जावडेकर, श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासह इतर महत्वाचे नेते असतील. 

पुणे - खासदार सुप्रिया सुळे कात्रज चौकातील विकासकामांची सकाळी 8.30 वाजता पाहणी करणार आहेत. 

सांगली  -  राष्ट्रीय लिंगायत समाज, मेळावा... जगदज्योती महात्मा बसव्वाण्णा जयंती निमित्त लिंगायत समाज मेळावा आणि बसवरत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आलंय... कामगार मंत्री सुरेश खाडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सुमित कदम यांची उपस्थिती असेल. 

सांगली - ऊस वाहतूकदारांचा निर्णायक मेळावा... एकमताने निर्णायक घोषणा होणार... ऊस तोडणी मुकादमांकडून दरवर्षी होणारी कोट्यावधीची फसवणूक, त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, हे सत्र थांबले पाहिजे. त्यासाठी ऊस तोडणी टोळी करार स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीकरण पद्धतीनेच झाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी ऊस वाहतूकदार मेळावा.. माजी खासदार राजू शेट्टी आणि संघटना नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत..  

नाशिक - वरुथिनी एकादशी निमित्ताने दुपारी 1 वाजता त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांना उटीचा लेप लावण्यात येणार असून हजारो भाविक हजेरी लावणार आहेत...

धुळे - महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.... यात प्रशांत दामले यांच्या नटराज पॅनलचे उमेदवार चंद्रशेखर पाटील आणि अपक्ष उमेदवार यशवंत येवलेकर यांच्यात लढत होत आहे... धुळे जिल्ह्यातील 300 मतदार आपला या नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.... नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी धुळ्यात पहिल्यांदा ही निवडणूक होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget