एक्स्प्लोर
VIDEO : यवतमाळमध्ये 10 ते 12 माकडांना पुराचा वेढा
यवतमाळ : महागाव कसबा लघुसिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातील एका झाडावर जवळपास 15 ते 20 माकडं अडकली आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यात महागाव कसबा लघुसिंचन प्रकल्प आहे.
महागाव कसबा येथील लघुसिंचन प्रकल्प यावर्षी पूर्णत्वास गेला असून, सदर प्रकल्पात प्रथमच पाणी अडवण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली.
दारव्हा-आर्णी मार्गावर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात एका बाभळीच्या झाडावर जवळपास 15 ते 20 माकडे अडकून पडली. चहूबाजूंनी पाणी असल्याने त्यांना खाली उतरता येत नाही. तीन दिवसांपासून ती माकडे झाडावर उपाशी अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
गावातील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती कळविली असून आहे आणि वन विभाग या माकडांना वाचण्यासाठी एक पथक तयार केल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडीओ :
VIDEO : यवतमाळमध्ये 10 ते 12 माकडांना पुराचा वेढा, तीन दिवसांपासून माकडांचा झाडावरच मुक्काम https://t.co/cdt0Z2drE0 pic.twitter.com/8eWTKsVDIn
— ABP माझा (@abpmajhatv) August 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement