एक्स्प्लोर
खासगी क्लासच्या शिक्षकांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
धुळे शहरातील प्रमोदनगर भागामध्ये संकल्प क्लासेस या खाजगी क्लासच्या गिरीश साळुंके आणि नरेंद्र महाले या शिक्षकांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
धुळे : धुळ्यात खासगी क्लासेसच्या संचालकाच्या जाचाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षाच्या या मुलीनं आज (सोमवार) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे शहरातील प्रमोदनगर भागामध्ये संकल्प क्लासेस या खाजगी क्लासच्या गिरीश साळुंके आणि नरेंद्र महाले या शिक्षकांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित विद्यार्थिनी आज सकाळी जेव्हा क्लासमध्ये गेली त्यावेळी तिला शिक्षकांनी बेंचवर उभं राहण्याची शिक्षा केली. या प्रकारानंतर तिनं फोनवरुन आपल्या मैत्रिणीला झाल्या प्रकार सांगितला. तसेच आपण यापुढे येणार नसल्याचंही तिनं सांगितलं. त्यानंतर तिनं घरी जाऊन गळाफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या क्लासचे संचालक आणि शिक्षक विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते आणि त्यांच्या जाचापायीच विद्यार्थिनी आत्महत्येस प्रवृत्त झाली असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दोन्ही शिक्षकांना तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement