एक्स्प्लोर
लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला !
![लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला ! 12th Exam Paper Leak On Social Media In Latur लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला !](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04161826/latur-12th-paper.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : बारावीच्या पेपरफुटीचं प्रकरण पुन्हा एकदा लातुरातून समोर आले आहे. पेपर सुरु असतानाच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुन्हा एकदा एकूण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्हा निर्माण झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा राज्यशात्राचा पेपर व्हाट्सअॅप फिरत आहे. यामुळे एकूण परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हा पेपर बाहेर आल्यानंतर परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थीना कॉपी पुरवण्यासाठी पालक शिक्षक यांनी काम सुरु केल्याचे आढळून आले.
तीन दिवसांपूर्वीच एबीपी माझाने लातूर जिल्ह्यातील शिवणी कोतवाल येथील कॉपीची बातमी दाखवल्यानंतर प्रशासन कडक कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षण सचिवांनी दिली. मात्र, आजही कॉपी सेंटरना पायबंद बसला नाही, हेच यातून दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)