एक्स्प्लोर

आत्तापर्यंत राज्यातील 11 लाख 87 हजार स्थलांतरीत मजूर आपल्या राज्यात परतले

1 मे पर्यंत एस.टी. च्या माध्यमातून 5 लाख 30 हजार प्रवाशांना घरी पोहचवलं. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी राज्यभरात 5427 कँप उभारले.

मुंबई : 1 जूनपर्यंत राज्यातील जवळपास 12 लाख स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात सुखरुप परतल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या राज्यात परतण्यासाठी आतुर असलेल्या स्थलांतरित मजूरांची घरी परतण्याची मागणी श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून त्यांच्या कोणत्याही मागण्या आता प्रलंबित नाहीत असंही हायकोर्टात सांगण्यात आलं आहे.

कोरोनामुळे हजारो मजुरांनी आपापल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि परिवहन प्रशासनाकडून मजूरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे तसेच बसेस सोडण्यात आल्या. मात्र, श्रमिक विशेष रेल्वे आणि बसेससाठी मजुरांनी दाखल केलेल्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांनाच अंधारात ठेवण्यात आले. या मजुरांना प्रतिक्षा कालावधीत देण्यात आलेली शेल्टरर्सही अरुंद, अस्वच्छ आहेत. तसेच मजुरांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू योग्यरित्या पुरविण्यात येत नसल्याचा दावा करणारी याचिका सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियननं हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

या सुनावणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत याचिकाकर्त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 1 जूनपर्यंत एकूण 822 श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून साधारणतः 11 लाख 87 हजार 150 मजूर त्यांच्या राज्यात परतले आहेत. श्रमिक ट्रेनमध्ये आता मणिपूरकडे रवाना होणारी फक्त एकच ट्रेन उरली असून त्यानंतर हे मिशन पूर्ण होईल असंही प्रतित्रापत्रातून नमूद करण्यात आले आहे. या श्रमिक ट्रेनसाठी मजूरांकडून कोणतेही भाडे आकारण्यात आलेले नाही. या कामगार आणि इतर अडकलेल्यांना परत पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारने जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत 97.69 कोटी रुपये वितरित केले. ज्यातनं अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय सेवा पुरविण्यसाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच 10 एप्रिलपर्यंत राज्यभरात 5427 रिलिफ कँप उभारण्यात आले. त्यात 6 लाख 66 हजार 994 मजुरांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. 31 मे पर्यंत हा आकडा 37 हजार 994 वर उतरला.

Thane Mission Began Again | प्रतिबंधित क्षेत्र वगळता ठाण्यातील दुकानं सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special ReportZero Hour Full : मविआचा फॉर्म्युला ते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, सविस्तर चर्चाZero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : दुसरे तरुण ठाकरे निवडणुकीच्या रिंगणातMaha Vikas Aghadi Seat Sharing : 85 चा तोडगा, वादावर पडदा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget