देशभरात मॉकड्रील, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवभरात
10th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.

10th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..
देशभर मॉकड्रील केले जाणार
मुंबई/दिल्ली – कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज कोर्टाच्या कामकाजात 39 नंबर वर प्रकरण आहे.गेल्या आठ महिने या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत पण प्रत्यक्ष सुनावणी होणार का याबद्दल पुन्हा चर्चा.
नितीन देशमुख आंदोलनाच्या पवित्र्यात
अकोला – बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार आहेत. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरूवात करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा असणार आहे. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपुरात पोहचेल. ते दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात दररोज 25 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. त्यांच्यासोबत मतदारसंघातील जवळपास एक हजार लोक पदयात्रेत सहभागी आहेत. या पदयात्रेत एका टँकरमध्ये फडणवीसांची आंघोळ घालण्यासाठी या 69 गावातील जमा केलेल्या पाण्याचा टँकर ते सोबत घेणार आहेत.
मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ठाकरे गटाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कदाचित आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांना याबाबत सूचक विधान केलं आहे.
ठाणे – आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधीच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. या बैठकीत प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी, राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, सकाळी 11 वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे. रिपोर्टर – राजू (सकाळी 8.30 वाजता अल्पेश करकरे लाईव्ह)
फडणवीस अमरावती दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर स्वातंत्र्य पूर्वकाळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेला यंदा 100 वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुपारी 12.30 वाजता सहभागी होणार आहेत. त्यानंतर रिद्धपुर येथे होणाऱ्या मराठी विद्यापीठाची पाहणी करतील.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विमुक्त जाती भटक्या जमातीचे आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भटक्या जाती विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्षांना बोलवलं आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित असतील तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 1.30 वाजता बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलंल तूर्तास अंतरिम संरक्षण आहे कायम. मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, साजिद, आबीद आणि नाविद या तिघांनी केलाय अटकपूर्व जामीन अर्ज.
वर्धा – जिल्ह्यातील अल्लीपूर नजीकच्या मनसावली या गावात एका पीठ गिरणीने गावातील नागरिकांसाठी अनोखी योजना सुरू केलीये. ही पीठ गिरणी ग्राम पंचायतच्या मालकीची आहे. येथे ग्राम पंचायतीचा कर भरणाऱ्यास मोफत दळण दिले जाते. 100 टक्के कर भरा आणि दळण मोफत मिळवा.
राजस्थान – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉग्रेस नेतृत्व सतर्क झालेय. प्रभार सुखजिंदर सिंह रंधावा राजस्थान मध्ये पोहचणार आहेत. यावेळी ते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री गहलोत यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत.
दिल्ली – गोधरा हत्याकांडीतील दोषींच्या जामिनावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने गुजरात सरकारला दोषी प्रत्येक व्यक्तीची गुन्ह्यातील भुमिका स्पष्ट करायला सांगितली आहे.
- किरिट सोमय्या पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.
परभणी – कारखाने बंद होण्याआधी उसाचे बिल द्या, 2021-22 पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमरण उपोषण केले जाणार आहे.
मुंबई – मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचं आंदोलन. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर मराठा समाजाच्या लाभधारक लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यांसाठी, तसेच महामंडळा तर्फे चालेल्या ढिसळ कारभारामुळे मराठा समाजाच्या उद्योजकांवर होणाऱ्या नुकसानाची जवाबदारी निश्चित करण्यासाठी, व्याज परतावे वेळेवर मिळावेत आणि कर्ज सुलभ होण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम पुर्णपणे लागू करण्यासाठी, आणि मराठा समाजच्याच मुलानं महामंडळाच्या नोकरीत समविष्ट करण्यासाठी तसेच निधी परत जाणार असेल तर ती कुणाची चुक? सरकारला दोष देण्यापेक्षा दिलेल्या सवलती का देण्यात येत नाही या सर्व मागण्यांसाठी, दुपारी 1 वाजता, किल्ला कोर्टाच्या पाठीमागे महामंडळाचे ऑफीस समोर.
बॉलिवूड स्टार नवाझऊद्दीन सिद्धिकीनं आपली पत्नी झैनाबविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सुनावणीत नवाझ आणि त्याच्या पत्नीनं आपापसातले वाद सांमज्यानं मिटवण्याचं कोर्टापुढे मान्य केलं होते. त्याबाबत आज हायकोर्टात आपले निर्देश जारी करणार.
- मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्ंयाची समस्या आणि उघड्या मैनहोल्स संदर्भात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.
- खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांनी सामना पेपरा बातमी छापून, मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत मागील तारखेस कोर्टात हजर न झाल्यानं, न्यायालयानं त्यांना ठोठावला होता एक हजार रुपये दंड. मात्र आज संजय राऊत शिवडी कोर्टात हजर राहण्याची शक्यता.
- मुंबई सत्र न्यायालयात सदानंद कदम याच्या जामीन अर्जावर सुनावणी. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम याना ईडीनं केली आहे अटक. मात्र कदम सध्या न्यायालयीन कोठडीत. मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी दाखल केलाय जामिनासाठी अर्ज. सदानंद कदम हे आमदार माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय.
आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये आज सामना होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
