एक्स्प्लोर

शिर्डी-हैदराबादसाठी 10750 रुपये, विमान कंपनीची मनमानी

हैदराबादसाठी सुरुवातीला 2200 रुपये भाडं आकारण्यात आलं. मात्र मिळालेला जास्त प्रतिसाद पाहता विमान कंपनीने दुसऱ्या दिवशी हैदराबादसाठी तब्बल 10 हजार 750 रुपये भाडं आकारलं.

शिर्डी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण झाल्यानंतर दोनच दिवसात विमान कंपनीचा मनमानी कारभार समोर आला आहे. प्रवाशांकडून हैदराबाद आणि मुंबईसाठी मनमानी पद्धतीने भाडं आकारलं जात आहे. हैदराबादसाठी सुरुवातीला 2200 रुपये भाडं आकारण्यात आलं. मात्र मिळालेला जास्त प्रतिसाद पाहता विमान कंपनीने दुसऱ्या दिवशी हैदराबादसाठी तब्बल 10 हजार 750 रुपये भाडं आकारलं. शिर्डीला येण्यासाठी प्रवाशांचा ओघ वाढू लागल्याने त्याचा फायदा कंपनी घेत आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेत शिर्डी विमानतळाचा समावेश नसल्याचं बोललं जात आहे. या योजनेत शिर्डी विमानतळाचा समावेश झाल्यास प्रवाशांना आणखी फायदा होईल. मात्र दोनच दिवसात कंपनीने केलेली भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं शिर्डीत येणाऱ्या भाविकांचं म्हणणं आहे. हैदराबादला जाणारं विमान रद्द, प्रवाशांची गैरसोय विमानतळाच्या लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादकडे जाणाऱ्या एअर अलायंस कंपनीच्या विमानाचं उड्डाण रद्द करण्याची वेळ आली. वातावरणातील बदलांमुळे हे विमान रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान शिर्डीत निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा दाखल झालं. पुन्हा 4.30 वाजता हे विमान हैदराबादसाठी रवाना होणार होतं. मात्र प्रवासी विमानात बसल्यावर प्रवासी आणि लगेज यांच्यात ताळमेळ लागत नव्हता. या सगळ्या घडामोडींमुळे विमानाला विलंब होत होता. त्यातच संध्याकाळची वेळ असल्याने अपुरा प्रकाश आणि हैदराबादमध्ये सुरु असलेला पाऊस यामुळे उड्डाण करण्यास परवानगी मिळाली नाही. विमानतळावर ताटकळत असलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा शिर्डीत मुक्काम करण्याची वेळ आली. या घटनेनंतर तब्बल दोन तास प्रवासी विमानतळावरच बसून होते. विमानतळावर पाणी किंवा चहाची व्यवस्थाही नसल्याने गैरसोय झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला. दरम्यान विमान कंपनीने अखेर अनेक प्रवाशांना शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली. सर्व प्रवाशांना आज सकाळी एकत्र बसमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर हैदराबादसाठी विमान 10.25 वाजता रवाना झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget