एक्स्प्लोर
उस्मानाबादच्या कोमल पवारची कौतुकास्पद कामगिरी, 100% गुण!

उस्मानाबाद: आज दुपारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा 88.74 टक्के निकाल लागला आहे. या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. काहींना तर चक्क 100 टक्के गुणंही मिळाले आहेत. अशीच किमया उस्मानाबादच्या भोसले हायस्कूलमधील कोमल पवारनं देखील केली आहे. माजी सैनिक असलेले व सध्या आकाशवाणी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रकाश पवार आणि शिक्षिका चित्रा पवार यांची कन्या कोमलनं दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. कोमल ही भोसले हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. कोमल पवारला मिळालेले गुण: मराठी - ८६ इंग्रजी - ९१ संस्कृत - ९७ गणित - ९७ विज्ञान - ९८ समाजशास्त्र - ९६ ५०० पैकी ४८९ गुण खेळ व चित्रकला - २१ गुण दरम्यान, 96.18 टक्के निकालासह कोकण विभागानं अव्वल राहण्याची पंरपरा कायम ठेवली आहे. तर नागपूर विभाग 83 टक्क्यांसह सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यंदा 193 मुलांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना 24 जूनला दुपारी 3 वाजता शाळेत गुणपत्रिका मिळणार आहेत तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची 18 जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
कोल्हापूर























