Maharashtra Rain : राज्यभरात मुसळधार पावसाच्या सरी; कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज (२७ जुलै रोजी) विशेषतः कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार (Weather Update) हजेरी लावत एकाच दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे. यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई आणि मुंबई उपनगरात दमदार पावसाच्या सरी (Rain) कोसळत आहे. अशातच विदर्भ आणि मराठवाड्यात मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा (Maharashtra Rain Alert) एकदा आगमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात अतिवृष्टि सदृश्य पाऊस झाल्याने चिंतेतहि भर पडली आहे.
राज्यातील 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, आज देखील(27 जुलै ) अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज (२७ जुलै रोजी) विशेषतः कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज यलो अलर्ट दिला आहे. सोबतच विदर्भातही सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर जायकवाडीतूनही गोदावरीत पाणी सोडले जाणार आहे. परिणामी, नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 17 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद
पूर्व विदर्भाला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. यात गोंदिया जिल्ह्यात काल 4 तालुक्यातील 17 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र धरणांच्या पाण्यामधून विसर्ग सुरू आहे. पुजारीटोला धरणाच्या 8 दरवाज्यांमधून 9590 क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. तर वैनगंगा नदीच्या धापेवाडा व्याज मिळून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठवरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, एका दिवसात सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळीत वाढ
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल (26 जुलै) जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अनेक ठिकाणी नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते. जोरदार झालेले या पावसाचा परिणाम पाणीसाठ्यात होताना पाहायला मिळते आहे. पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काल एकाच दिवसांमध्ये सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये तब्बल दहा टक्क्याने वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात काल जोरदार पाऊस आला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ही 51% इतकी वाढली असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत 26,600 क्युसेक विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात
उजनी धरणातून भीमा नदीत 26,600 क्युसेक विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वरील सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे येत असून हा विसर्ग 30000 क्युसेक पेक्षा जास्त होणार आहे. सध्या उजनी धरण जवळपास 96% भरलेले असून वरून येणारे पाणी धरणातून सोडावे लागत आहे. अजूनही पाऊस वाढत गेल्यास उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















