एक्स्प्लोर

Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा प्रस्ताव दोनदा उद्धव ठाकरेंनी फेटाळला; मनसे नेत्यानं सांगितलं नेमकं काय घडलं होतं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेने दोन वेळा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गटाने मनसेचा प्रस्ताव फेटाळला होता, असं संदीप देशपांडेंनी सांगितलं होतं.

Sandeep Deshpande on Raj Thackeray-Uddhav Thackeray: महाराष्ट्राचं राजकारण गेल्या वर्षभरात घडलेल्या दोन मोठ्या घटनांनी अक्षरशः ढवळून निघालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपच्या (BJP) मदतीनं काही आमदारांच्या समर्थनासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्वीस्ट आला. अशातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काल (3 जुलै) झालेल्या मनसेच्या बैठकीतही मनसे पदाधिकाऱ्यांनी हाच सूर आवळला होता, तसेच याच आशयाचे बॅनर्सही झळकले होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेना दोन वेळा एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. 

एबीपी माझाशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, "मनसेने दोन वेळा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गटाने मनसेचा प्रस्ताव फेटाळला होता." तसेच, आम्ही हात पुढे केला होता मात्र ठाकरेंनी टाळी टाळली. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असंही संदीप देशपांडे म्हणाले. 

संदीप देशपांडे म्हणाले की, लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. 2014 आणि 2017 या दोन्ही वर्षी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. पण ठाकरेंकडून टाळाटाळ करण्यात आली. हो किंवा नाही, असं कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं गेलं नाही. ऐनवेळी माघार घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात युती किंवा आघाडी ही सगळी समीकरणं गरजेतून घडतात. आता सध्या गरज आहे का? याचा विचार पक्ष नेतृत्त्व करत असतं.

पाहा व्हिडीओ : Raj Thackeray Majha Katta 2014 : सेना-मनसे युतीचे प्रयत्न कुणामुळे फसले? राज ठाकरे यांचा माझा कट्टा

राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, मनसेच्या बैठकीत सूर 

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra NCP Crisis : अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी; जुने वाद पुन्हा उफाळण्याची मंत्र्यांना भिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget