Latur News : आज विलासराव असते तर...असा विचार सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना येत असतो. कारण देशात आता ज्या प्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे त्याची पार्श्वभूमी आहे. सध्या काँग्रेसचे विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत नेणारा एक नेता आढळून येत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी व्यक्त केले आहे.


लातूर (Latur) जिल्ह्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उल्हास पवार बोलत होते. 


एकाच व्यक्तीची आठवण येते ती म्हणजे विलासराव देशमुख


कमलनाथ हे भाजपात प्रवेश करत असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण भाजपामध्ये (BJP) दाखल झाले होते. आजमितीला देशातील 13 काँग्रेसचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते भाजपामध्ये गेले आहेत. या बाबत त्यांना विचारले असता देशात आज स्थिती वेगळी आहे. यावेळी एकाच व्यक्तीची आठवण येते ती म्हणजे विलासराव देशमुख, असे मत उल्हास पवार यांनी व्यक्त केले आहे.


ते व्यावसायिक होते म्हणून ते भाजपामध्ये गेले


देशातील 13 काँग्रेसचे मुख्यमंत्री पद भूषविले नेते भाजपामध्ये गेले आहेत याबाबत नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ हे भाजपत प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी अशोक चव्हाणही भाजपात दाखल झाले होते. ते व्यावसायिक होते म्हणून ते भाजपामध्ये गेले, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.   


कमलनाथ आजच करणार भाजपामध्ये प्रवेश? 


मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath)  काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. कमलनाथ हे त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्यासह अनेक आमदारांना सोबत घेत भाजपमध्ये (BJP)  प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कमलनाथ शनिवारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार आणि खासदार मुलगाही सोबत आहेत. रविवारी पाच वाजता कमलनाथ भाजपचं कमळ हातात घेण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव  उपस्थित राहणार असल्याचे समजते. 


इतर महत्वाच्या बातम्या


अशी जोडी दुर्मिळच! चव्हाण पिता-पुत्र इतिहास घडवणार, 'हा' मोठा विक्रम नोंदवला जाणार


Pune Supriya Sule : दादा-ताईत तू तू मैं मैं सुरुच! लोकसभेत आम्हाला मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिलं; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला