पुणे : खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याच्या ताई आणि दादा यांच्या तू तू मै मै सुरुच असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांनी संसदेत भाषण देऊन उपयोग नाही. गावागावात फिरावं लागतं आणि त्यासोबतच सेल्फी काढत असल्याची टीका सुप्रिया सुळेंवर केली होती. त्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत आम्हाला मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिलं आहे. अनेक मोठ्या लोकांनी संसदेत भाषणं केली असल्याचं त्यांनी खड्या शब्दांत सांगितलं. 


फॅमिली दिल से बनती है!


पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं मात्र याचवेळी त्यांनी अजित पवारांना टोगा लगावण्याची एकही संधी सोडली नाही. अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीच्या एका कार्यक्रमात पवार कुटुंबियांनी मला एकटं सोडलं तरी तुम्ही मला एकटं सोडू नका, अशी भावनिक साद घातली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी सगळे लोक माझी फॅमिली आहे. शेजारी बसलेल्या लोकांकडे हात दाखवून हे देखील माझं कुटुंब असल्याचं त्या म्हणाल्या आणि फॅमिली दिल से बनती है म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. 


संसदेत अनेक मोठ्या लोकांनी भाषणं केली!


देशाच्या संसदेत महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाषणं केली आहेत. त्याचे भाषणं ऐकून आम्ही संसदेत पाय ठेवतो. यशवंतराव चव्हाणांचे संसदेतील भाषण गाजले आहे. त्याकाळात काही प्रसारमाध्यामं सोडली तर एवढे प्रसारमाध्यमं नव्हती मात्र त्यांच्या भाषणं आजही अनेकांना आठवतात आणि त्यांच्या भाषणाची शैली आणि त्यावरुन घेण्यात आलेले निर्णय आजही आठवतात. संसदेतील भाषण आरोप, राजकीय प्रवेश करायला उपयोगी ठरतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


मेरीटवरच मला निवडून द्या!


इथेनॉल आणि पेटीएमच्या घोटाळ्यासंदर्भात मी स्व:त संसदेत प्रश्न उपस्थित केले. पेटीएमने 70 हजार कोटींचं नुकसान केलं आहे. हा मुद्दा उपस्थित केला नाही तर सामान्य लोक यात भरडले जातात. या सगळ्यासाठी आम्ही संसदेत बसून लढतो, असंही त्या म्हणाल्या. बारामतीकरांनी मला तीन वेळा निवडून दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीकरांना आवाहन करते की मला कोणताही भावनिक विषय वगरे न घेता मला मेरीटवर निवडून द्या. लोकशाही आणि दडपशाही नाही त्यामुळे इथे कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवते, असं त्यांनी थेट सांगितलं.


इतर महत्वाची बातमी-


Pune Drug : पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाधड कारवाई; 37 लाखांचे कोकेन, एमडी, गांजा जप्त