Latur News : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या दिवशी म्हणजे आज मी फार अपेक्षेने गुलाबाचं फुल घेऊन आलो होतो. मात्र, 'ते' आलेच नाहीत. आयोजकाच्या माध्यमातून माझे हे गुलाबाचे फुल त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे सूचक विधान भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी करत काँग्रेस आमदार अमित देशमुखांना (Amit Deshmukh) टोला लगावला. आमदार अमित देशमुख यांच्यासाठी त्यांनी गुलाबाचे फुल आणल्यामुळं परिसंवादात हास्यकल्लोळ निर्माण झाला. राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भव्य महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं 100 व्या नाट्य संमेलन लातूर येथे सुरु आहे. या कार्यक्रमात निलंगेकर बोलत होते. 


गैरहजर असणाऱ्या व्यक्तीसाठी मी गुलाबाचे फुल घेऊन आलो होतो


सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आमदार अमित देशमुख आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. मात्र या परिसंवादात आमदार अमित देशमुख लातूरमध्ये असताना सुद्धा गैरहजर राहिले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यासपीठावर आल्याबरोबर आज व्हॅलेंटाईन डे आहे. गैरहजर असणाऱ्या व्यक्तीसाठी मी गुलाबाचे फुल घेऊन आलो होतो. मात्र माझा संदेश आयोजकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावा असं सांगत आयोजकांच्या स्वाधीन त्यांनी गुलाबाचे फुल केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.


देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग


काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली ही कृती अनेक संदेश देणारी जरी असली तरी देशमुख भाजपात येतील का याबाबत सध्या तरी शंकाच आहे.या महिन्यातील 18 तारखेला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आहे. विलास सहकारी साखर कारखाना परिसरात या पूर्ण आकृती पुतळ्याचा अनावरण होणार आहे. यासाठी देशमुखांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आली आहेत. लातूर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात निमंत्रण पत्रिका देण्यात आले आहेत. त्यासंदर्भाची तयारी मोठ्या स्वरूपात सुरू आहे. पत्रिकेवर अशोक चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने होते. मात्र ते भाजपात गेल्याने अनेक तर्क लावली जात आहेत. मात्र ज्या पद्धतीने कार्यक्रमाची तयारी सुरू आहे त्यावरून हे शक्तिप्रदर्शनच असल्याचं दिसून येत आहे. अमित देशमुख किंवा धीरज देशमुख या दोन्ही आमदार बंधूंनी ही भाजप प्रवेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळला आहे. मात्र कार्यक्रमाचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, देशमुखांचे सूचक मौन आणि संभाजी पाटलांचा देशमुखांसाठी केलेलं वक्तव्य याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Rajya Sabha Election : शरद पवार गटातून नेता आयात करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट, शेवटी प्रफुल्ल पटेलांनाच उमेदवारी