मुंबई : काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. भाजपामध्ये अशोक चव्हाण दाखल होताच त्यांना भाजपने राज्यसभेचे (Rajya Sabha) मोठे गिफ्ट दिले.
आता अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जाणार असल्याने ते आपल्या वडिलांच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहेत. शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र चारही सभागृहांचे सदस्य होण्याचा आगळा वेगळा विक्रम नोंदवला जाणार आहे.
शंकरराव चव्हाण चारही सभागृहांचे सदस्य
शंकरराव चव्हाण हे दोन वेळेस राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. तर अशोक चव्हाणदेखील दोन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्रिपद भूषविणारी ही पिता-पुत्रांची पहिलीच जोडी आहे. तसेच शंकरराव चव्हाण हे मुंबई प्रांतासह पाच वेळा विधानसभेचे सदस्य तर एक वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. शंकरराव चव्हाण हे दोन वेळे लोकसभेवर निवडून गेले आहेत तर तीन वेळा ते राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहेत. शंकरराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ४६ वर्षांची राहिली.
पिताश्रींच्या पावलावर अशोक चव्हाणांचे पाऊल
अशोक चव्हाण यांच्या 1985 सालापासून यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. 1986-1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ते चार वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा विधान परिषद सदस्य राहिले. दोन वेळा लोकसभेवर अशोक चव्हाण हे ३८ वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.
शंकरराव चव्हाणांनी भूषविलेली पदे
- नगराध्यक्ष - नांदेड नगरपालिका
- उपमंत्री - महाराष्ट्र राज्य
- पाटबंधारे मंत्री
- मुख्यमंत्री - दोन वेळा
- संरक्षणमंत्री
अशोक चव्हाणांनी आतापर्यंत भूषविलेली पदे
- खासदार
- विधानपरिषद सदस्य
- राज्यमंत्री
- महसूलमंत्री
- उद्योगमंत्री
- मुख्यमंत्री - दोन वेळा
- प्रदेशाध्यक्ष
- सार्वजनिक बांधकाम मंत्री
- राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यसमितीचे सदस्य
शरद पवारदेखील राहिलेत चार सभागृहांचे सदस्य
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील चारही सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. शरद पवार हे तब्बल सहा वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा त्यांनी विधान परिषदेचे सदस्यपदही भूषविले आहे. ते सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिले. तर दोन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
राम लहर संपली! आता रामनाम सत्य है! संजय राऊतांची अशोक चव्हाणांसह भाजपवर ‘रोखठोक’ टीका!
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला खिंडार, कमलनाथ 'कमळ' हातात घेण्याची शक्यता