Latur Farmers News : प्रगतिशील शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; अपार कष्टाने पिकवलेल्या सिताफळांच्या बागेवर फिरवला जेसीबी
Farmers News : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू कंदे यांनी आपल्या शेतात सीताफळाची बाग लावली होती. मात्र आज अपार कष्टाने पिकवलेल्या सिताफळांच्या बागेवर त्यांनी जेसीबी फिरवला आहे.
Latur News : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू कंदे यांनी आपल्या शेतात सीताफळाची बाग लावली होती. पाच वर्षांपूर्वी एक हेक्टर शेतीत चार लाख रुपये खर्चून त्यांनी ही सीताफळाच्या बागेची लागवड केली होती. त्यासाठी मोठ्या कष्टही त्याने केले होते. मात्र सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम रोगराईत झाला. सीताफळाच्या बागेवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी खर्च होऊ लागला. त्यातच बाजारपेठेत सीताफळाला योग्य भाव मिळत नव्हता. पाच वर्षापासून खर्चाचं प्रमाण बसत नसल्याने अखेर नाईलाजाने शेतकऱ्यांने सीताफळाच्या बागेवर जेसीबी फिरवण्याचा निर्णय घेतला.
योग्य बाजारभाव मिळत नसल्याने टोकाचे पाऊल
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाच्या बागा आहेत. अनेक बागायतदार शेतकऱ्यांना यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढती रोगराई, कीटकनाशकाचा खर्च, बाग टिकवण्यासाठी होणारी धावपळ आणि बाजारपेठेत नसलेला भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. परिणामी प्रगतिशील शेतकरी विष्णू कंदे यांनी आज अखेर टोकाचे पाऊल उचलत अपार कष्टाने पिकवलेल्या सिताफळांच्या बागेवर जेसीबी फिरवला आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल(गुरुवारी) मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील देवणी निलंगा तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मध्यरात्री अचानक लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि परिसर देवणी परिसर त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील खरोसा भाग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कव्हा, हरंगुळ, खोपेगाव, सारोळा, बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. मात्र मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.
ढगाळ वतावणाचा रब्बी पिकावर परिणाम
यवतमाळमध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, तुर आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. ढ़गाळ वातावरणामुळे सध्या तुरीचे पीक फुलोऱ्याच्या व शेंगा लागणयाचा अवस्थेत असल्याने ढगाळ वातावरणामुळे फुले गळण्याचे आणि अळी करपा रोग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
हे ही वाचा