Marathi Movie Poster Release : 'लास्ट स्टॅाप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' लवकरच सर्वांच्या भेटीला
Marathi Movie Poster Release : 'लास्ट स्टॅाप खांदा ...प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या सिनेमाच्या निमित्तानं एक नवी जोडी प्रेक्षकांना दिसेल. टीमनं अधिकृत पोस्टर अपलोड करत दिली माहिती...

Marathi Movie Poster Released : विनीत पारुळेकर दिग्दर्शित लास्ट स्टॅाप खांदा ...प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट 21 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमाघरात प्रदर्शित होणार असल्याचं अधिकृत पोस्टर टीमकडून प्रसारित करण्यात आला आहे. श्रमेश बेटकर आणि जुईली टेमकर ही जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रदीप मनोहर जाधव, सचिन कदम, अमृता सचिन जाधव प्रस्तुत या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर,अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी फौज स्टारकास्ट म्हणून आपल्याला दिसणार आहे. त्याच बरोबर अनेक पाहुणे कलाकार देखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.
चित्रपटाचा पोस्टर पाहून दोन्ही पात्रांच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत झालायं. श्रमेश बेटकर हा 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मराठी विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचला, या चित्रपटाची खासीयत म्हणजे हा चित्रपट खुद्द श्रमेश बेटकर लिखित आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधलं 'अगं शालू' हे गाणं रिलीज झालं ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
View this post on Instagram
श्रमेश बेटकर आणि जुईली टेमकर हे दोघं जोडपं म्हणून प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहेत, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामध्ये या नवीन जोडप्याची प्रेमाची गोष्ट नक्की काय असणार या गूढाचा उलगडा 21 नोव्हेंबरला होणार.























