कोल्हापूर : आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar election) यांची शेवटची लढाई आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule BJP) यांनी केला. गेल्या आठवड्यात (7 ऑक्टोबर ) चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर होते. बावनकुळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांची शेवटची लढाई
बावनकुळे म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार सोडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे गेले. शरद पवारांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहित धरले. त्यामुळे ठाकरे आणि पवार एकाकी पडले. शरद पवार तर शेवटची लढाई लढत आहेत. पवारांकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते आणि पक्ष शोधावा लागत आहे"
महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची
भाजपाचा विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. जो पक्ष विकास करू शकतो त्याच पक्षाच्या मागे लोक उभे राहतात. म्हणूनच अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन मिळत आहे. महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची आहे. आम्ही पक्षापेक्षा देशासाठी काम करणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे किंवा अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यात गैर काहीच नाही, असं बावनकुळे म्हणाले.
लोकसभेला 45, विधानसभेला 225 जागा जिंकणार
दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीच जिंकणार, असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्त्वात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महायुती लोकसभेच्या 45 हून अधिक तर विधानसभेच्या 225 हून अधिक जागांवर विजय मिळविणार आहे. भाजपा राज्यभरात ‘घर चलो अभियान आणि महाविजय-2024’ राबवित असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे", असा दावा बावनकुळेंनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना इस्लामपुरातून (Islampur) जाहीर आव्हान दिलं. भाजप सांगली (Sangli News) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मिळून 225 आमदार निवडून येतील. निशिकांत पाटील यांना आता 440 व्होल्टची ऊर्जा द्यायची, असे म्हणत बावनकुळेंनी जयंत पाटील यांच्या होमपिचवर आव्हान दिले.
संबंधित बातम्या