एक्स्प्लोर

Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'

आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी मशागत करून पीक तयार करायचे, शिवसैनिकांनी राबायचे आणि तुम्ही सत्तेच्या व धमकीच्या जीवावर आयते पीक कापून नेणार? ही कुठली राजकारणाची पद्धत?" अशी विचारणा त्यांनी केली.

Sanjay Pawar:  "पैशाच्या आणि दबावाच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह चोरणारे स्वतःच्या हिंमतीवर कधीच मैदानात उतरू शकत नाहीत," अशा शब्दात कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बंडखोर खासदारांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे हे सर्वांच्या छातीवर पाय ठेवून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दबावाचे गलिच्छ राजकारण

संजय पवार म्हणाले, सध्या देशातील आणि राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. ते म्हणाले, "आज देशात फोडाफोडीचे, पैशाचे आणि दबावाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. ज्या भारताला जगातील एक नंबरचा लोकशाही देश म्हटले जाते, तिथे केवळ सत्तेसाठी लोकशाहीची मूल्ये संपवली जात आहेत. जर विरोधकांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरावे. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी मशागत करून पीक तयार करायचे, शिवसैनिकांनी राबायचे आणि तुम्ही सत्तेच्या व धमकीच्या जीवावर आयते पीक कापून नेणार? ही कुठली राजकारणाची पद्धत?"

मुख्यमंत्रीपदाच्या ईर्षेपोटी दिल्लीत वाऱ्या

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमागे मुख्यमंत्री पदाची ईर्ष्या कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "अनेक लोक सध्या दिल्लीला चकरा मारत आहेत, काही जण तिथून निराश होऊन परत येत आहेत. देवेंद्र फडणवीस हे सहजासहजी बाजूला होणार आहेत का? केवळ कुणालातरी शह देण्यासाठी आणि दिल्लीश्वरांसमोर आपली ताकद मोठी दाखवून मुख्यमंत्री पद लाटण्यासाठी हा सर्व खेळ सुरू आहे. पण हे अत्यंत घातक असून देश चुकीच्या दिशेने चालला आहे," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

जनता धडा शिकवेल

अडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडणाऱ्यांवर संताप व्यक्त करताना संजय पवार म्हणाले, "कुटुंब व्यवस्था अडचणीत आल्यानंतर कुटुंबप्रमुखाला सोडून जाणे या लोकांना शोभते का? पक्षाने तुम्हाला पदे दिली, चिन्ह दिले, निवडणुकीत लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या आणि आज स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही पाठ फिरवत आहात. जे लोक निघून गेले आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच धडा शिकवेल."

फिनिक्स पक्षासारखी उभारी घेणार

राज्यातील वाढत्या राजकीय अनागोंदीवर इशारा देताना ते म्हणाले की, "आज आपण श्रीलंकेमध्ये आणि नेपाळमध्ये जी परिस्थिती पाहत आहोत, लोक जसे तिथे सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, तशीच परिस्थिती काही वर्षांत हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात होईल. जनता या राजकारणाला कंटाळली असून ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही." शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना पवार यांनी मान्य केले की प्रत्येक क्षेत्रात वाईट दिवस येत असतात. "राजकारण, व्यवसाय किंवा खेळ असो, 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो. आज आमचे वाईट दिवस आहेत, पण उद्या ते नक्की बदलतील. याचा अर्थ आम्ही संपलो असा नाही. आम्ही फिनिक्स पक्षासारखे राखेतून पुन्हा उभारी घेऊ आणि 'मातोश्री'च महाराष्ट्रात एक नंबरवर आहे, हे आमच्यातील शिवसैनिक पुन्हा दाखवून देतील."

छातीवर पाय ठेवून उभे राहतील

शेवटी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवत संजय पवार म्हणाले, "उद्धव साहेब हे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते संकटांना घाबरून खचून जाणारे पुत्र नाहीत, तर संकटांवर उरून उरणारे आहेत. लाखो-कोटी शिवसैनिकांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ते विरोधकांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा ताकदीने उभे राहतील. 

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget