Aaditya Thackeray in Kolhapur : गद्दारांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत, पण राज्यातील जनता आम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही
Aaditya Thackeray in Kolhapur : युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची झंझावाती शिवसंवाद यात्रा सुरु आहे. काल त्यांची यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचल्यानंतर आज यात्रेचा दुसरा दिवस आहे.
Aaditya Thackeray in Kolhapur : युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची झंझावाती शिवसंवाद यात्रा सुरु आहे. काल त्यांची यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचल्यानंतर आज यात्रेचा दुसरा दिवस आहे. त्यांनी कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोराचा चांगलाच समाचार घेतला. गद्दाराचे खरे चेहरे आता दिसू लागले आहेत. ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचा कट सुरु आहेय, पण राज्यातील जनता कधीच आम्हाला एकटे पाडू देणार नाही, असा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
राज्यभरात मी शिवसंवाद यात्रा काढत आहे,राज्यातील जनता आम्ही उद्धव साहेबांसमवेत असल्याचे सांगत असल्याचे ते म्हणाले. हा राजकीय दौरा नाही, लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी दौरा असल्याचे ते म्हणाले.
तानाजी सावंतांच्या टीकेकडे लक्ष देत नाही
बंडखोर शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही.आदित्य ठाकरे हे कोण आहेत?तो फक्त एक साधा आमदार आहे, यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नसल्याचे म्हटले होते. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या, त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचे आदित्य म्हणाले.
गद्दारांचे आता खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. या 40 बंडखोर आमदारांना आम्हाला एकटे पाडण्याचा डाव सुरु आहे, पण राज्यातील जनता आम्हाला एकटे पडू देणार नाही. गद्दार हा गद्दारच असतो. हे सरकारच बेयकायदेशीर असून 33 दिवस झाले, तरी या जम्बो मंत्रिमंडळाला तिसरा माणूस सापडला नसल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारकडून निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करताना सांगितले की, निर्णयांना स्थगिती देऊन महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट स्थगिती देत सुटणे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या