एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Worst Road : कोल्हापुरातील रिक्षा संघटना 26 जानेवारीला महापालिकेला घेराव घालणार

कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा युनियनने २६ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करण्याचे नियोजन केले आहे.

Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा युनियनने २६ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करण्याचे नियोजन केले आहे. रिक्षा युनियनचे सदस्य जाफर मुजावर म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा चालकांनी 31 ऑक्टोबर रोजी केएमसीला घेरावाचा इशारा दिला होता. त्यानंतर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जे केएमसीचे प्रशासक देखील होते. त्यांनी महापालिका अधिकारी आणि रिक्षा युनियन यांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका  अधिकाऱ्यांनी महिनाभरात सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

कृती समितीचे सदस्य बाबा इंदुलकर म्हणाले की, दोन महिने उलटले तरी रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. नवीन रस्त्यांचे काम सोडाच, शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते भरण्यातही महापालिकेने कोणताही रसा दाखवलेला नाही. (Kolhapur Worst Road) 

रस्त्यांची वाताहत, अधिकारी धारेवर 

दरम्यान, शहरातील रस्त्यांची वाताहत झाली असल्याने चौफेर टीका कोल्हापूर मनपा प्रशासनावर होत आहे. मनपा (Kolhapur Municipal Corporation) प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना नोटीस बजावून रस्ते कामाचा हिशेब मागितला आहे. रस्ते कामांचा स्पष्ट अहवाल न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

तसेच रस्त्यांच्या कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत तीन विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांना सुद्धा प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता नारायण भोसले यांना प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात आला होता. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे निवृत्त उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना पाच हजाराचा दंड करण्यात आला आहे. या सर्वांनी रस्ते कामाच्या नियोजनात तसेच अंमलबजावणीत दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई केली होती. 

त्याचबरोबर ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget