एक्स्प्लोर

Chandrakant Patil : एका रात्रीत निर्णय बदलला! कोल्हापूरमध्ये आता चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार  

कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. एका रात्रीत हा निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करतील आणि चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये असतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल, याबाबत काल आदेश जारी केला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र 15 ऑगस्टला जिल्ह्यामध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? याची चिंता लागून राहिली होती. 

मात्र, अखेर मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांचा शपथविधी झाल्याने त्यांना ध्वजारोहण करण्यासाठी जिल्हे विभागून देण्यात आले आहेत. मंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माहिती देण्यात आली आहे. 

घरोघरी तिरंगा’ उपक्रम, तिरंगासह सेल्फी पोर्टलवर पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन 

दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत https://harghartiranga.com/ या पोर्टलवर PIN A FLAG व UPLOAD SELFIE WITH FLAG  दोन बटनवर क्लिक करुन सेल्फी, तिरंगासह फोटो अपलोडरावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

तसेच याबाबत नागरिकांना व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवगत करावे व कोल्हापूर जिल्ह्यातून तिरंगासह जास्तीत- जास्त सेल्फी, फोटो अपलोड होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावयाची आहे.

हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल. म्हणजेच कार्यालयांनी दररोज सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरविणे आवश्यक आहे.

घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. काही गावे शहर या ठिकाणी घरे/ इमारती/ कार्यालये/दुकाने यांचे तिरंगा लावल्यानंतरचे फोटो व व्हिडीओ ड्रोन शूटिंगने घेवून त्याचे फोटो व व्हिडीओ पाठविण्यात यावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या आहेत.

Chandrakant Patil : एका रात्रीत निर्णय बदलला! कोल्हापूरमध्ये आता चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Embed widget