Samarjeetsinh Ghatge vs Hasan Mushrif : समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुश्रीफांना पाडून आमदार होणार, मुश्रीफ म्हणाले, मर्दानगी जास्त असेल, तर निधी आणा
Samarjeetsinh Ghatge vs Hasan Mushrif : कागल तालुक्यातील राजकारण भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार होत चालला आहे.
Samarjeetsinh Ghatge vs Hasan Mushrif : कागल तालुक्यातील राजकारण भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार होत चालला आहे. दोन्ही नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.
यामुळे 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीची एकप्रकारे रणधुमाळीच कागल तालुक्यात सुरु झाली आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आपण आमदार होणार असल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांना डिवचले होते. कागल शहर भाजपकडून शाहू सभागृहात आयोजित बांधकाम कामगार कल्याण साहित्य वाटप समारंभात ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले की, कागलमधील दादागिरीची भाषा आता जनताच बंद करणार आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दबावाखाली राहू नये. संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या लाभार्थ्यांना विनाकपात पेन्शन घरपोच देऊ. येत्या काळात काही लोकांची सर्जरी करायची आहे ती जनताच करेल. 25 वर्षे मंत्रिपद असूनही सर्वसामान्यांच्या वसाहतीतील घरे मोठी झाली नाहीत, पण त्यांच्या दोन नंबर फळीतील लोकांची घरे मोठी झाली आहेत.
हसन मुश्रीफ यांच्याकडून जोरदार पलटवार
या टीकेनंतर आता हसन मुश्रीफ यांनी जोरदार पलटवार करताना समरजितसिंह घाटगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईला खेटे मारून निधी अडवण्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त निधी आणा, असा टोला लगावला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, या कागल तालुक्यात आलेला निधी कुणीच परत जाण्यासाठी आजवरच्या कोणत्याच आमदाराने प्रयत्न केला नाही, पण आमच्या तालुक्यात अशी एक शक्ती जन्माला आली आहेय ज्यांच्याकडून मुंबईला खेटे मारून निधी अडवण्याचे काम केले जाते. मर्दानगी अंगात जास्त असेल, तर जास्तीत जास्त निधी आणा. विकासकामांना खीळ घालण्याचे काम कधीच झाले नाही. अशा शक्ती ओळखल्या पाहिजेत.
इतर महत्वाच्या बातम्या
- Satej Patil on Dhananjay Mahadik : आता सतेज पाटलांकडूनही धनंजय महाडिकांना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात..
- Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश नसल्याने कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समित्यांचे अंतिम मतदारसंघ जाहीर
- Kolhapur Municipal Corporation Elections 2022 : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द, आजवरच्या तयारीचे लाखो रुपये, मेहनतीवर पाणी फेरले!