Raju Shetti : तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरच्य चेकनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
Raju Shetti : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये दिले पाहिजे. हे निर्णय झाले नाही तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारला दिला.
राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरच्या चेकनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी शेट्टी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकर्यांचे प्रश्न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्याला तुटपूंजी मदत जाहीर केली आणि तीही वेळेवर मिळत नाही. पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या. हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतकर्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना मात्र उन्हातान्हात उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना शेतकर्यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी, प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे असा सवाल उपस्थित केला.
शेतकऱ्यांना फसवलं जात आहे
एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य अशी घोषणा केली. परंतु शेतकर्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सध्या उन्हाळा सुरुवात झाला आहे. विहिरीत व बोरमध्ये पाणी आहे मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पीके वाळत आहेत. धरणात तयार होणार्या विजेवर शेतकर्यांचे हक्क आहे मग शेतकर्यांना दिवसा वीज का दिली जात नाही. शेतकरी 15 टक्के वीज वापरत असून 30 टक्के वीज वापरत असल्याचे खोटे रेकॉर्ड दाखवले जात असून शेतकर्यांना फसवले जात असल्याची आरोप शेट्टी यांनी केला.
वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी , शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या , किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा अश्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. वीज आमच्या हक्काची, शेतकर्यांची वीज तोडू नका, जाहीर केलेले 50 हजार रुपये द्या यासह विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, सागर शंभूशेट्टे, यांच्यासह पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध केला. या चक्का जाम आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर सुमारे 10 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या